या कामासाठी 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत एकूण 14 टप्प्यांत वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये महामार्गावरील वाहतूक अंशतः बंद राहणार आहे. या कालावधीत ठराविक वेळेत नागपूर आणि मुंबई दिशेने जाणारी वाहतूक रोखण्यात येईल.
जुगाड नाही तर टॅलेंट! दुचाकीच्या इंजिनवर बनवली अनोखी जीप; आता मिळाली 'मिनी विमाना'ची ऑर्डर
advertisement
कधी, कुठं असेल ब्लॉक?
31 जानेवारी रोजी वर्धा जिल्ह्यातील साखळी क्रमांक 58.9 ते 59.6 दरम्यान नागपूर वाहिनीवरील वाहतूक दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत बंद राहील. तसेच साखळी क्रमांक 65.4 येथे नागपूर वाहिनीवरील वाहतूक दुपारी 3.00 ते 4.00 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.
1 फेब्रुवारी रोजी सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक 31.5 ते 37.7 दरम्यान नागपूर वाहिनीवरील वाहतूक दुपारी 3.00 ते 4.00 या वेळेत बंद राहील. याच दिवशी साखळी क्रमांक 37.7 ते 45.4 दरम्यान मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत बंद राहणार आहे.
2 फेब्रुवारी रोजी हिंगणा, नागपूर परिसरात साखळी क्रमांक 8.6, 9.0 आणि 9.5 येथे मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी 3.00 ते 4.00 या वेळेत बंद ठेवण्यात येईल. याच ठिकाणी नागपूर वाहिनीवरील वाहतूक दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत बंद राहील.
3 फेब्रुवारी रोजी आर्वी, वर्धा येथील साखळी क्रमांक 84.4 येथे मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी 3.00 ते 4.00 या वेळेत बंद राहणार आहे.
या कालावधीत प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन MSRDC कडून करण्यात आले आहे.






