TRENDING:

तर सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला नसता; नितीन गडकरी पोटतिडकीने म्हणाले, मुलांना विनंती करतो की...

Last Updated:

Nitin Gadkari News: रस्ते अपघातावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, लहान लहान नियमांचे पालन केले तर तुमचे कुटुंबही आनंदी राहील आणि अनेक लोकांचे प्राणही वाचतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नई दिल्ली: 2024 या एका वर्षात 18 वर्षांखालील 10 हजार मुलांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला. तर 1 लाख 20 हजार म्हणजेच सुमारे 66.4% लोक असे होते ज्यांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला, त्यांचे वय 18 ते 45 दरम्यान होते. ही आकडे केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली, ते न्यूज18च्या ‘रस्ते सुरक्षा अभियान 2025’ या उपक्रमात बोलत होते.
News18
News18
advertisement

रस्ते सुरक्षेच्या लहान आणि मूलभूत नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे आणि यामुळे आपण केवळ आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतोच, तसेच अनेक लोकांचे प्राणही वाचवू शकतो, असे गडकरींनी सांगितले.

शरिराच्या आत लपवले 12 कोटींचे कॅप्सूल, डॉक्टरांनी बाहेर काढले

रस्ते अपघाताबाबत बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, मला दुःखाने सांगावे लागत आहे की रस्ते अपघातांची संख्या कमी झालेली नाही, उलट ती वाढली आहे. सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे ही मुले जी माझ्यासमोर बसली आहेत.हीच देशाचे भविष्य आहेत. आणि जर त्यांनी माझे बोलणे व्यवस्थित समजून घेतले आणि रस्त्याचे नियम पाळले, तर भविष्यात अपघात कमी होतील.

advertisement

नितीन गडकरी म्हणाले, या वर्षी ज्यांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला त्यापैकी काही इंजिनिअर, काही डॉक्टर, आणि काही विद्यार्थी होते. तुम्ही त्या कुटुंबाची परिस्थिती समजून घ्या जिथून हे लोक होते. सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात 10,000 मृत्यू झाले आहेत. शाळेत जाण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी, रस्ता ओलांडण्यासाठी त्यांना त्यांच्या नियोजनात विचार करावा लागेल आणि मग या मुलांचे प्राण वाचतील.

advertisement

चीनी व्हायरसने शेअर बाजाराचे १२ वाजवले, गुंतवणुकदारांचे ११ लाख कोटी पाण्यात

गडकरी म्हणाले, ज्यांनी वैध ड्रायव्हिंग लायसन्स घेतले नाही आणि कार-बाईक चालवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मुळे 35,000 लोकांचा मृत्यू झाला. मुले आपल्या पालकांवर आणि आसपासच्या लोकांवर प्रभाव टाकतात. आणि आजकाल असा कायदा देखील तयार झाला आहे की मुलाने गाडीने अपघात केला आणि जर तो अल्पवयीन असेल, तर पालकांवर केस दाखल होतो. त्यामुळे मुलांनी जर हे ठरवले की आम्ही चुकीचे करणार नाही, कायद्याचे पालन करू, तर मला वाटते की नियमांचे पालन केल्यामुळे मुलांचेही प्राण वाचतील आणि अनेक लोकांचे प्राण वाचवण्याचे श्रेय त्यांना मिळेल.

advertisement

8400 कोटींना विकली कंपनी, आता म्हणतोय...

मी विशेषतः मुलांना विनंती करतो की रस्ते सुरक्षेसाठी तयार केलेल्या लहान लहान नियमांचे पालन करा. जसे की गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका, रेड सिग्नल असेल तर थांबा, स्कूटर चालवत असाल तर दोघांकडे हेल्मेट असणे आवश्यक आहे, कारमध्ये बसल्यावर पुढे आणि मागे सीट बेल्ट लावा, जर बेल्ट लावले असते तर सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला नसता. तुमच्या कुटुंबात अशी कोणतीही घटना होऊ नये आणि तुम्ही या सर्व नियमांचे पालन कराल, तर तुमचे कुटुंबही आनंदी राहील आणि अनेक लोकांचे प्राणही वाचतील, असे गडकरी पोटतिडकीने म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/देश/
तर सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला नसता; नितीन गडकरी पोटतिडकीने म्हणाले, मुलांना विनंती करतो की...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल