सोलापूर : रांगोळी, कंदिल, फराळ आणि फटाके अशा सर्व गोष्टींप्रमाणेच दिवाळीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'किल्ले' आहे. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की लहान मुलांना वेगवेगळे किल्ले बनवण्याचे वेध लागतात. सोलापुरातील संतोषनगर जुळेमध्ये राहणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी चला मतदान करू या, मतदानाचा हक्क बजावा, भारतीय लोकशाही बळकट करण्याचा संदेश बच्चे कंपनीने सिंहगड किल्ला बनवून दिला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आदेश गोडसे आणि त्यांच्या शालेय मित्रांनी मिळवून हा किल्ला बनवला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ही किल्ले सिंहगडची प्रतिकृती करून अभिनव संदेश दिला आहे.
advertisement
आदेश घोडसे वय 15 राहणार संतोषनगर जुळे सोलापूर असे किल्ला बनवलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे नाव आहे. सिंहगड किल्याची हुबेहुब प्रतिकृती तयार केली आहे. तसेच ह्या वेळेस विधानसभेची निवडणूक असल्याने चला मतदान करुया उज्वल भविष्य घडवूया. मतदान हा आपला अधिकार आहे, आपले मत वाया जाऊ देऊ नका, मतदानाचा हक्क मतदानाच्या दिवशी नक्की बजावा, असा संदेश पण या निमीत्ताने दिला आहे.
वेशाव्यवसाय करणाऱ्या महिलांनी साजरी केली दिवाळी, पुण्यातील 'एक दिवा अस्तित्वाचा' उपक्रम काय, VIDEO
हा किल्ला बनवण्यासाठी पाच दिवसाचा कालावधी लागला आहे. आदेश घोडसे आणि त्याच्या शालेय मित्रांनी एकत्रित येऊन हा किल्ला बनवला आहे. हा किल्ला तयार करताना शालेय मित्रांनी वेगवेगळ्या कामाची जबाबदारी घेतली होती. काही जणांनी हा किल्ला बांधणीसाठी मदत केली तर काहीनी साहित्य आणण्याचे काम केले.
किल्ला तयार केल्यामुळे मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास तर कळत आहे. किल्ला हे शौर्याच ध्येयाच प्रतिक मानल्या जात. दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेच बिज मनामध्ये रुजवण्यांच काम या मुलांच्या मनात होत आहे. शिवाय दिवाळीच्या सुट्टीत एक विरंगुळाही मिळत आहे. सदरचा किल्ला पाहण्यास संतोषनगर जुळे सोलापूर येथील नागरिक येत आहेत. आदेशचे आणि त्याच्या मित्राचे कौतुक करत आहेत.