12 महिने मागणी, एकरी खर्च 25 हजार, 400 रु किलोपर्यंत दर, या शेतीतून करा लाखोंची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : हिवाळा हा लसणाच्या लागवडीसाठी सर्वात योग्य काळ मानला जातो. कांदा लागवडीसोबत शेतकरी लसणाची लागवड करत असतात.
advertisement
1/5

हिवाळा हा लसणाच्या लागवडीसाठी सर्वात योग्य काळ मानला जातो. कांदा लागवडीसोबत शेतकरी लसणाची लागवड करत असतात. या काळात हवामानातील थंडी आणि कोरडे वातावरण लसणाच्या वाढीस अनुकूल असते. त्यामुळे अनेक शेतकरी हिवाळ्यात लसणाची लागवड करून मोठा नफा कमवत आहेत. मग आता ही लागवड कशी करायची? हेच आपण जाणून घेणार आहोत..
advertisement
2/5
लागवडीचे नियोजन कसं करायचे? - लसणाची लागवड करण्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ सर्वोत्तम मानला जातो. या काळात जमीन भुसभुशीत, पाणी न साचणारी आणि मध्यम ते भारी प्रकारातील असणे आवश्यक आहे. लागवडीपूर्वी शेताची खोल नांगरट करून सेंद्रिय खत मिसळल्यास पीक जोमाने वाढते. रांगांमधील अंतर 10-15 सें.मी. असल्यास वाढ चांगली होते. लागवडीसाठी वापरले जाणारे कंद निरोगी, मोठे व रोगमुक्त असावेत. यामुळे उत्पादनात वाढ होते आणि बाजारभाव चांगला मिळतो.
advertisement
3/5
एकरी किती खर्च येतो? - एक एकर लसूण लागवडीचा खर्च साधारणपणे 25,000 ते 35,000 रुपयांपर्यंत येतो. यामध्ये बियाणे, खत, मजुरी, औषधे आणि सिंचन खर्चाचा समावेश असतो. जर शेतकऱ्याने नवीन बियाणे घ्यायचे ठरवले तर हा खर्च थोडासा वाढू शकतो. योग्य व्यवस्थापन, वेळेवर पाणी, खत आणि रोग नियंत्रण केल्यास लसणाचे उत्पादन एकरी 12 ते 20 क्विंटल मिळू शकते.
advertisement
4/5
बाजारात लसणाचे भाव सातत्याने चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो. हिवाळ्यातील लसणाला बाजारात प्रचंड मागणी असते. सरासरी बाजारभाव 80 ते 150 रुपये प्रति किलोपर्यंत मिळत असल्याने एकरी लसणाचे उत्पादन 1 लाख ते 2.5 लाख रुपयांपर्यंत विकले जाते. जर शेतकऱ्याला हंगामात जास्त भाव मिळाला तर हा नफा आणखी वाढू शकतो. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे लसणाचे पीक आज अनेक शेतकऱ्यांसाठी कमाईचे उत्तम साधन बनले आहे.
advertisement
5/5
आधुनिक पद्धतींमध्ये मल्चिंग, ड्रिप सिंचन आणि सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते. तसेच उत्पादनानंतर योग्य प्रकारे वाळवणी आणि साठवणूक केल्यास बाजारात उत्तम दर मिळतो. काही शेतकरी लसूण पावडर आणि लसूण पेस्ट बनवून विक्री करून चांगली कमाईही करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
12 महिने मागणी, एकरी खर्च 25 हजार, 400 रु किलोपर्यंत दर, या शेतीतून करा लाखोंची कमाई