TRENDING:

सोनालिकाचा CNG ट्रॅक्टर लॉन्च! महिंद्रा, स्वराज, कुबोटाचं मार्केट होणार जाम, फीचर्स काय आहे?

Last Updated:
Sonalika CNG Tractor: भारतीय शेतीत आधुनिक, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. इंधनदरवाढ, वाढते प्रदूषण आणि शेतीवरील एकूण खर्चांचा भार कमी करण्यासाठी अनेक कंपन्या शेतकऱ्यांसाठी नव नवीन तंत्रज्ञान विकसीत करत असतात.
advertisement
1/5
सोनालिकाचा CNG ट्रॅक्टर लॉन्च! महिंद्रा,स्वराजचं मार्केट होणार जाम, फीचर्स काय?
भारतीय शेतीत आधुनिक, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. इंधनदरवाढ, वाढते प्रदूषण आणि शेतीवरील एकूण खर्चांचा भार कमी करण्यासाठी अनेक कंपन्या शेतकऱ्यांसाठी नव नवीन तंत्रज्ञान विकसीत करत असतात.
advertisement
2/5
अशातच आता सोनालिका कंपनीकडून नवीन CNG ट्रॅक्टर लॉन्च करण्यात आला आहे. नागपूरमध्ये आयोजित कृषी मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत या ट्रॅक्टरचे लॉन्चींग करण्यात आले आहे.
advertisement
3/5
ट्रॅक्टरचे फीचर्स काय? -   या नवीन CNG/CBG ट्रॅक्टरची रचना पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. 2000 RPM चे शक्तिशाली इंजिन आहे. 2+3 कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन आणि साइड-शिफ्ट गिअर्स देण्यात आले आहेत. 14.9×28 आकाराचे मोठे मागील टायर्स देण्यात आले आहेत.
advertisement
4/5
ज्यामुळे नांगरणी, फवारणी, वाहतूक अशा सर्व शेतीकामात मोठा फायदा होणार आहे. तसेच 40 किलोपर्यंतची इंधन क्षमता 14 किलो + 27 किलो यामुळे वारंवार इंधन भरण्याची गरज भासणार नाही.
advertisement
5/5
ग्रामीण वाहतुकीसाठी खास तयार केला सेटअप - अॅग्रोव्हिजनमध्ये कंपनीने या ट्रॅक्टरसोबत खास ट्रॅक्टर-ट्रॉली सेटअपही प्रदर्शित केली. ज्याचा उपयोग शेतमाल बाजारात नेणे. जनावरांसाठी चारा वाहतूक.खत आणि बियाणे पुरवठा या कामांसाठी उपयुक्त ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
सोनालिकाचा CNG ट्रॅक्टर लॉन्च! महिंद्रा, स्वराज, कुबोटाचं मार्केट होणार जाम, फीचर्स काय आहे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल