TRENDING:

आज शनिवारचा दिवस ४ राशींसाठी संकटाचा! शनिदेव कर्माचं फळ देणार

Last Updated:
Astrology News : शनिवार 11 ऑक्टोबर 2025 हा दिवस वैदिक ज्योतिषानुसार विशेष मानला जातो. हा दिवस शनिदेवाला समर्पित असल्याने भक्त शनिदेवाची आराधना करून त्यांच्या कृपेची याचना करतात.
advertisement
1/5
आज शनिवारचा दिवस ४ राशींसाठी संकटाचा! शनिदेव कर्माचं फळ देणार
शनिवार, 11 ऑक्टोबर 2025 हा दिवस वैदिक ज्योतिषानुसार विशेष मानला जातो. हा दिवस शनिदेवाला समर्पित असल्याने भक्त शनिदेवाची आराधना करून त्यांच्या कृपेची याचना करतात.या दिवशी ग्रहांची हालचाल होणार असून ३ राशींनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पाहूया आजचे राशी भविष्य
advertisement
2/5
मेष रास -  नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी अनुकूल काळ. वरिष्ठांची साथ लाभेल आणि कार्यक्षेत्रात प्रगती होईल.पैशांच्या बाबतीत सावधगिरी आवश्यक, उधार व्यवहार टाळा.प्रियजनांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.कौटुंबिक आनंद मिळेल. हलका व्यायाम आणि संतुलित आहार आरोग्यास लाभदायक ठरेल.हनुमानाला तांबडं फुल अर्पण करा.
advertisement
3/5
वृषभ रास - जुन्या प्रकल्पांना पूर्णता मिळेल.नवीन संधी दार ठोठावतील. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि बचतीचा विचार करा.कुटुंबीयांसोबतचा वेळ आनंददायी ठरेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील.डोळ्यांची आणि झोपेची काळजी घ्या. देवीला पिवळं फुल अर्पण करा.
advertisement
4/5
मिथुन रास -सर्जनशील कामांसाठी दिवस अनुकूल ठरेल.वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल.लहान गुंतवणुकीतून अपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता. मित्रांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत होतील.भावनिक बंध अधिक मजबूत होतील. झोप कमी झाल्याने थकवा जाणवू शकतो त्यामुळे विश्रांती घ्या. तुळशीला पाणी अर्पण करा.
advertisement
5/5
कर्क रास -  जबाबदाऱ्या वाढतील पण यशही मिळेल. सहकाऱ्यांचा सहकार्य लाभेल. पैशांच्या बाबतीत स्थैर्य येईल.घरातील वडिलधाऱ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल. मानसिक शांतता टिकवण्यासाठी ध्यानाचा अवलंब करा. शिवलिंगावर दूध अर्पण करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आज शनिवारचा दिवस ४ राशींसाठी संकटाचा! शनिदेव कर्माचं फळ देणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल