TRENDING:

तुमच्यामागे साडेसाती आहे का? 23 ऑगस्टला शनिश्चरी आमवस्येच्या दिवशी हे उपाय नक्की करा

Last Updated:
Shani Amavasya 2025: भाद्रपद महिना 10 ऑगस्टपासून सुरू झाला असून या महिन्यातील अमावस्या शनिवारी 23 ऑगस्ट 2025 रोजी येत आहे. त्यामुळे या दिवशी शनिश्चरी अमावस्या पाळली जाणार आहे.
advertisement
1/5
तुमच्या मागे साडेसाती आहे का? 23 ऑगस्टला शनिश्चरी आमवस्येच्या दिवशी हे उपाय करा
भाद्रपद महिना 10 ऑगस्टपासून सुरू झाला असून या महिन्यातील अमावस्या शनिवारी 23 ऑगस्ट 2025 रोजी येत आहे. त्यामुळे या दिवशी शनिश्चरी अमावस्या पाळली जाणार आहे. शनिदेवाशी संबंधित सर्व धार्मिक उपासना आणि उपायांसाठी ही तारीख अत्यंत खास मानली जाते. शास्त्रानुसार, शनिश्चरी अमावस्येला शनीची पूजा करणाऱ्यांवर त्यांची कृपा राहते. त्यामुळे साडेसाती, धैय्या यांसारखे नकारात्मक परिणाम कमी होतात, तसेच जीवनात स्थैर्य व सकारात्मकतेचा प्रभाव वाढतो.
advertisement
2/5
<strong>धार्मिक महत्त्व -</strong>  ज्योतिषशास्त्रानुसार, शनिश्चरी अमावस्या ही दिवस नोकरी, व्यवसाय आणि पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी शुभ मानली जाते. या दिवशी केलेल्या विशेष उपायांमुळे न्यायालयीन प्रकरणांत यश मिळते, व्यवसाय-करिअरमध्ये प्रगती होते आणि कर्जाच्या बोजातून सुटका होण्यास मदत होते. भक्तजन शनीच्या आशीर्वादाने आयुष्यातील अडथळे दूर करून शांती आणि समृद्धीची प्राप्ती करतात.
advertisement
3/5
शनि अमावस्या 2025 ची तारीख व मुहूर्त भाद्रपद महिन्यातील अमावस्या 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11.55 पासून सुरू होऊन 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11.35 वाजता संपेल. त्यामुळे शनिश्चरी अमावस्येची पूजा व उपासना २३ ऑगस्टला करणे अधिक फलदायी ठरेल.
advertisement
4/5
<strong>महत्त्वाचे मुहूर्त -</strong>  स्नान-दान मुहूर्त : सकाळी 4.26 ते 5.10 पूजा मुहूर्त : सकाळी 7.32 ते 9.09 शनि पूजा मुहूर्त : संध्याकाळी 6.52 ते रात्री 8.15
advertisement
5/5
<strong>उपाय काय? -  </strong>या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान, तर्पण आणि पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. शनिदेवाच्या मूर्तीवर काळ्या वस्तू जसे की तीळ, उडीद अर्पण करावेत. त्यांना तेल, फुलांचा हार व प्रसाद अर्पण करून तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. शनि चालीसा पठण केल्याने विशेष फल मिळते. गरजूंना अन्नदान केल्यास शनीची विशेष कृपा प्राप्त होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
तुमच्यामागे साडेसाती आहे का? 23 ऑगस्टला शनिश्चरी आमवस्येच्या दिवशी हे उपाय नक्की करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल