Aajache RashiBhavishya: धन लाभ होणार, आरोग्याच्या दृष्टीने चांगला दिवस, तुमच्या राशीच आजचं भविष्य काय?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Aajache RashiBhavishya: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा असेल, त्यांची आर्थिक कुंडली काय म्हणते आहे, जाणून घेऊया.
advertisement
1/13

मेष राशी - तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुम्ही तुमच्या खास पद्धतीने लोकांना हाताळलेत आणि तुमची बुद्धिमत्ता वापरलीत तर लोकांना समजावण्यात, पटविण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. अफवा आणि फुकटच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होईल परंतु त्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल. कौटुंबिक जबाबदारी आज तुमच्यावर पडू शकते. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी -आपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. तुम्ही जे कराल ते परिपूर्ण पद्धतीने कराल. म्हणूनच तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना चांगले काम करून दाखवा आणि तुम्ही किती सक्षम आहात हेही दाखवून द्या. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. आज तुम्हाला अचानक लक्ष्मी प्राप्ती होण्याचा योग आहे. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी -आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कुठल्या जुन्या गोष्टी आज वादाचे कारण बनू शकते. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
7/13
तूळ राशी -इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु, नात्यामध्ये मजबुती येईल. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे. आज तुम्ही राहिलेले सर्व कामे पूर्ण करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. आज तुम्हाला प्रवासाचा योग आहे आणि त्यासाठी कंटाळा तुम्ही करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - मनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही यावर सहजपणे मात कराल. आज अनेक लोक तुमचा सल्ल्याने कामे करतील. तुम्ही हाती घेतलेले काम आज सहज रित्या पूर्ण होईल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
10/13
मकर -आज नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल आणि रुकेलेले पैसे परत मिळू शकतात. प्रेमजीवनात जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. आरोग्य सामान्य राहील, पण मानसिक तणाव टाळण्यासाठी विश्रांती घ्या. हातात घेतलेले कामे मार्गी लागतील. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. आज महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी -तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल, ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो. आज नको त्या ठिकाणी पैसे खर्च करावे लागतील. सावधगिरी राखा. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
13/13
टीप: हे राशीभविष्य सामान्य आहे आणि वैयक्तिक कुंडलीवर अवलंबून परिणाम बदलू शकतात. अधिक अचूक भविष्यासाठी ज्योतिषीशी संपर्क साधा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache RashiBhavishya: धन लाभ होणार, आरोग्याच्या दृष्टीने चांगला दिवस, तुमच्या राशीच आजचं भविष्य काय?