Mahesh Manjrekar : '...तर मतभेद टोकाला जातील', राज ठाकरेंसोबतच्या मैत्रीबद्दल महेश मांजरेकर असं का म्हणाले?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Mahesh Manjrekar on Raj Thackeray : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमाच्या निमित्तानं बोलताना महेश मांजरेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दल भाष्य केलं.
advertisement
1/7

अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा येत्या 30 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
advertisement
2/7
या सिनेमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा ज्वलंत विषय मांडण्यात आला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
advertisement
3/7
मुंटाला दिलेल्या मुलाखतीत, राज ठाकरे आणि तुम्ही एकत्र सिनेमा करणार का? असा प्रश्न विचारला असला महेश मांजरेकर यांनी उत्तर देत म्हटलं, "माझी राजासोबतची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. राजाला सिनेमाचं तत्त्वज्ञान माहिती आहे."
advertisement
4/7
"तो चित्रपट पाहतो. त्याचं विश्लेषण करतो. त्याच्या आता दडलेला दिग्दर्शक बाहेर येईल, याचीच मला भीती वाटते."
advertisement
5/7
महेश मांजरेकर म्हणाले, "दोन लोक वेगळ्या दृष्टीकोनातून एखादी गोष्ट पाहतात आणि मग मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी मला मतभेद नकोत."
advertisement
6/7
"माझ्यासाठी माझी दोस्ती टिकवणं जास्त महत्त्वाचं आहे. राज जितका ठाम आहे तितकाच मीही ठाम आहे. म्हणूनच एका सिनेमावर काम करताना मतभेद उद्धभवल्यास ते टोकाला जातील."
advertisement
7/7
महेश मांजरेकर शेवटी म्हणाले, "मित्र म्हणून त्यानं सांगितलं तर मी जरुर ऐकेन. पण दिग्दर्शक म्हणून मी माझं खरं करेन."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mahesh Manjrekar : '...तर मतभेद टोकाला जातील', राज ठाकरेंसोबतच्या मैत्रीबद्दल महेश मांजरेकर असं का म्हणाले?