Aajache Rashibhavishya: धनलाभ होणार, महत्त्वाची कामे मार्गी लागतील, फक्त ही चूक टाळा, पाहा 19 जुलैचं राशीभविष्य
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Aajache Rashibhavishy: ग्रह ताऱ्यांच्या अनुकूल प्रतिकूल स्थितीवरून प्रत्येक राशींचे भविष्य ठरत असते. आज 19 जुलै शनिवारी देखील बहुतेक राशीवर ग्रह तारे यांचा सकारात्मक प्रभाव पहायला मिळेल, तर काही राशीसाठी ते प्रतिकूल असेल.
advertisement
1/13

मेष- ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील. किरकोळ स्वरूपाच्या समस्या असतील, तर त्या सुटतील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. काही अनपेक्षित लाभ होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल.
advertisement
2/13
वृषभ- महत्त्वाची कामे पुढे ढकलणे ठीक राहील. त्यामुळे तुमचा अनावश्यक खर्च होणे टळेल, पैशाच्या बचतीचे नियोजन नीट करा, मात्र, त्यासाठी चुकीच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नका. नियमानुसार कामे करा. रहदारीचे नियम धाब्यावर सोडू नका.
advertisement
3/13
मिथुन- मनात उत्साह राहील. महत्त्वाची कामे झटपट आटोपून घ्या. पैशाचा ओघ सुरू राहील. लोकांकडून प्रशंसा होईल. जवळच्या लोकांच्या सहवासात याल. तुमच्या शब्दाला मान दिला जाईल. मनात नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होतील.
advertisement
4/13
कर्क- धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. तुमच्या कल्पना साकार होण्यासाठी लोकांची मदत मिळेल. कार्यक्षेत्रात कामाचे स्वरूप बदलेल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. घरातील कामांसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल.
advertisement
5/13
सिंह- तुमची अनेक प्रलंबित कामे आटोक्यात येतील. लोकांशी बोलताना स्पष्टता ठेवली पाहिजे. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. जुनी येणी वसूल होतील. त्यासाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील.
advertisement
6/13
कन्या- महत्त्वाची कामे पुढे ढकलणे योग्य ठरेल. कामे झालीच पाहिजेत असा अट्टहास करू नका. त्यातून तुमच्या हातून चुका होऊ शकतात. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. रहदारीचे नियम पाळा. कागदोपत्री पूर्तता वेळच्या वेळी करणे गरजेचे आहे.
advertisement
7/13
तूळ- ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. महत्त्वाची कामे सोप्या पद्धतीने होतील. कामाचा ताण कमी होईल. त्यामुळे तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मोठ्या लोकांमध्ये ऊठबस राहील.
advertisement
8/13
वृश्चिक- फार दगदग होईल, अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. आपली नेहमीची कामे वेळच्या वेळी करा. वेळ वाया घालवू नका. तब्येतीला जपा. आराम आणि आहार याकडे लक्ष द्या. तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाणार नाहीत, याची काळजी घ्या.
advertisement
9/13
धनू- तुम्हाला ग्रहमानाची चांगली साथ मिळेल. लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल. हाती घेतलेले कार्य यशस्वीपणे पूर्ण कराल. जनसंपर्क चांगला राहील. शैक्षणिक प्रगतिपुस्तक झळकते राहील. जवळच्या प्रवासाचा योग येईल.
advertisement
10/13
मकर- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मालाची विक्री चांगली होईल. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. नवीन जबाबदारीत गुंतलेले राहाल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे.
advertisement
11/13
कुंभ- कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीला पूरक वातावरण राहील. तुमच्यावर धनलक्ष्मी प्रसन्न राहील. मात्र, आर्थिक निर्णय जपून घ्या. एखाद्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अजून कुणाचे मत विचारात घेतले पाहिजे. नातेवाइकांच्या संपर्कात याल.
advertisement
12/13
मीन- कार्यक्षेत्र गाजवाल. तुमचा सल्ला लोकांसाठी उपयुक्त ठरेल. मालमत्तेची कामे होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. अनेक उत्तम लाभ होतील. प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील.
advertisement
13/13
टीपः हे नावाच्या पहिल्या अक्षरावरून सर्व सामान्य राशिभविष्य आहे. अचूक आणि विश्लेषणात्मक सखोल भविष्य जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या ज्योतिषाची प्रत्यक्ष भेट घेऊन जाणून घेऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: धनलाभ होणार, महत्त्वाची कामे मार्गी लागतील, फक्त ही चूक टाळा, पाहा 19 जुलैचं राशीभविष्य