TRENDING:

Aajache Rashibhavishya: कुणाला संधी, तर कुणावर संकट, शुक्रवारी तुमच्या नशिबी काय? दिवसाची सुरुवात करण्याआधी पाहा आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: आजचा शुक्रवार काही राशींसाठी खास असेल. तर काहींसाठी नवी आव्हाने घेऊन येईल. तुमच्या नशिबात आजचा दिवस कसा? आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13
कुणाला संधी, तर कुणावर संकट, शुक्रवारी तुमच्या नशिबी काय? आजचं राशीभविष्य
मेष राशी- तुमच्या जोडीदाराचे धाडस आणि निष्ठेमुळे तुम्हाला आनंद मिळेल. आजच्या दिवशी धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून देवाण-घेवाणीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. आज तुमचा शुभ अंक 7 आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. व्यापाऱ्यांना आज व्यापारात तोटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च लागू शकतो. कुणाचा साथ न मिळवता आजच्या दिवशी तुम्ही भरपूर आनंद मिळवू शकाल. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची भेट अशा व्यक्ती सोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. नेहमीपेक्षा आज तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. आज तुम्हाला अचानक लक्ष्मी प्राप्ती होण्याचा योग आहे. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी - आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. वैवाहिक जीवनात आज आनंदाची वार्ता मिळणार आहे. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - आपल्या आरोग्याची उगाच चिंता करू नका, त्यामुळे आपला आजार बिघडण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. आज तुमचा दिवस खर्चिक असणार आहे. हाती घेतलेले कामे पूर्ण करा त्याचा लाभ नक्की होईल आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
7/13
तुळ राशी - तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळविण्यासाठी वेळकाळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - तुमच्या जवळ आज पैसा ही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. आज तुम्ही नवीन वस्तू घेत असला तर आजचा दिवस हा तुमच्या साठी शुभ असणार आहे. दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल. आज तुमच्या घरी पाहुणे येणार असून तुमचा वेळ खर्चिक होणार आहे. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी - आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. अविवाहित लोकांना आज आनंदाची बातमी मिळेल. आज तुमचा शुभ अंक 2 रंग असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी - तुमच्या जवळ आज पैसा ही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल. तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. कुठून तरी उधार परत मिळू शकते ज्यामुळे तुमच्या काही आर्थिक समस्या दूर होतील. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: कुणाला संधी, तर कुणावर संकट, शुक्रवारी तुमच्या नशिबी काय? दिवसाची सुरुवात करण्याआधी पाहा आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल