'त्याला घरातून धक्के मारून...', आलियाने सांगितला महेश भट्ट-रणबीर कपूरच्या भेटीचा भन्नाट किस्सा, राहाबद्दल म्हणाली...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
आलिया भट्टने पती रणबीर कपूर आणि वडील महेश भट्ट यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला, पण सोबतच मुलगी राहाच्या भविष्यातील बॉयफ्रेंडबद्दल एक अशी धम्माल भविष्यवाणी केली आहे, जी ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री आलिया भट्ट सध्या काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या ‘टू मच’ या टॉक शोमुळे चर्चेत आहे. या शोच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये वरुण धवनसोबत हजेरी लावलेल्या आलियाने तिच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टींवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
advertisement
2/8
विशेष म्हणजे, तिने पती रणबीर कपूर आणि वडील महेश भट्ट यांच्या पहिल्या भेटीचा गोड किस्सा सांगितला, पण सोबतच मुलगी राहाच्या भविष्यातील बॉयफ्रेंडबद्दल एक अशी धम्माल भविष्यवाणी केली आहे, जी ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही.
advertisement
3/8
काजोलने आलियाला रणबीरसोबतच्या नात्याच्या सुरुवातीच्या काळात काय घडलं, असं विचारलं. तेव्हा आलियाने वडिलांना म्हणजेच महेश भट्ट यांना पहिल्यांदा रणबीरबद्दल कसं सांगितलं, हे स्पष्ट केलं.
advertisement
4/8
आलिया म्हणाली, “मी माझ्या बाबांना खूप सहजपणे सांगितलं की मला रणबीरच्या प्रेमात पडलं आहे. तेव्हा माझ्या बाबांनीही हसून उत्तर दिलं होतं की, ‘ते तुझ्या डोळ्यांत दिसत आहे!’”
advertisement
5/8
या घटनेनंतर एकदा महेश भट्ट आलियाला रणबीरच्या घरी सोडायला गेले होते. तेव्हा आलियाने रणबीरला खाली बोलावलं आणि तिथेच त्यांची पहिली भेट झाली.
advertisement
6/8
पहिल्या भेटीचा अनुभव सांगताना आलिया म्हणाली, “रणबीर खाली आला आणि त्याने लगेच दोन्ही हात जोडले. त्याने माझ्या बाबांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि बाबांनीही त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला.”
advertisement
7/8
महेश भट्ट त्यावेळी काही बोलले नाहीत, पण दोघांच्या डोळ्यांत एकमेकांबद्दलचं प्रेम मात्र त्यांना दिसलं. महेश भट्ट त्यावेळी जितके कूल होते, तेवढा कूलनेस रणबीर मुलीच्या बाबतीत दाखवणार नाही, अशी भविष्यवाणी आलियाने केली.
advertisement
8/8
आपल्या मुलीवर जीव ओवाळून टाकणाऱ्या रणबीरच्या पॅरेंटिंगबद्दल बोलताना ती गंमतीत म्हणाली, “मला खात्री आहे, पुढे जाऊन जर राहाने तिच्या बॉयफ्रेंडला रणबीरशी भेटायला आणलं, तर रणबीर त्या मुलाला धक्के मारून घरातून बाहेर काढेल!”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'त्याला घरातून धक्के मारून...', आलियाने सांगितला महेश भट्ट-रणबीर कपूरच्या भेटीचा भन्नाट किस्सा, राहाबद्दल म्हणाली...