Journey Astrology: अपघात होण्याआधीचे संकेत! प्रवासाला निघताना अशा गोष्टी दिसणं म्हणजे अपशकुन?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Unlucky Signs Before Journey: आपल्या देशात प्राचीन काळापासून काही गोष्टी शुभ किंवा अशुभ मानल्या गेल्या आहेत, त्याचा जीवनात अवलंब केला जात आहे. आज आपण तंत्रज्ञान आणि आधुनिक विचारसरणीच्या जगात राहत असलो तरी कधीकधी अशा छोट्या-छोट्या घटना आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. बऱ्याचदा लोक या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात, तर काही लोक तसे अनुभव सत्य मानतात.
advertisement
1/6

अपघाताची सगळ्यांनाच भीती वाटते, कारण वाहने आणि रस्त्यांची सध्याची परिस्थिती असे आहे की, बाहेर गेलेला माणूस सहीसलामत घरी येईल का याबाबत मनात भीती असते. असे मानले जाते की, आपल्याला अज्ञात धोक्याची सूचना काही संकेत आधीच देतात. त्याकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते. जेव्हा असे संकेत दिसतात तेव्हा थोडा वेळ थांबणे आणि शुभ वेळ पाहून पुन्हा निघणे शहाणपणाचे मानले जाते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.
advertisement
2/6
घरातून बाहेर पडताच बूट किंवा चप्पल तुटणे - तुम्ही घराबाहेर पडताच तुमचा बूट किंवा चप्पल तुटणं अशुभ संकेत मानला जातो. असे मानले जाते की यामुळे प्रवास यशस्वी होणार नाही आणि वाटेत मध्येच काही अडचण येऊ शकते.
advertisement
3/6
रस्त्यावर मृत प्राणी दिसणे - रस्त्यावर कोणताही मृत प्राणी दिसणे अशुभ मानले जाते. ते पुढे काही नुकसान होऊ शकते, असा त्याचा अर्थ होतो.बाहेर पडताच शिंका येणे - घराबाहेर पडताना अचानक शिंक आली तर ते देखील एक अशुभ लक्षण मानलं जातं. कामात विघ्न येण्याचा तो संकेत मानला जातो.
advertisement
4/6
एखाद्याशी भांडण किंवा कटुता येणे - घराबाहेर पडताच एखाद्याशी वाद किंवा कटुता निर्माण झाली तर ते देखील एक नकारात्मक लक्षण मानले जाते. यामुळे संपूर्ण दिवसासाठी काम खराब होऊ शकते.दूध, पाणी, अन्न किंवा पूजेचं ताट पडणं - बाहेर पडताना दूध, पाणी, अन्न किंवा पूजेचं ताट अचानक पडल्यास तो देखील एक अशुभ संकेत मानला जातो. काम अपूर्ण राहू शकते.
advertisement
5/6
वाटेत अडखळणे - रस्ता सरळ असतानाही तुम्ही अचानक ठेचकळलात तर ते देखील प्रवास शुभ नसल्याचे लक्षण आहे. बरेच लोक घरी परतणे आणि नंतर अशा वेळी पुन्हा बाहेर न जाणे चांगले मानतात.मांजराने रस्ता ओलांडला - ही धारणा खूप पूर्वीपासून रुढ आहे. घराबाहेर पडताना मांजरीने रस्ता ओलांडला तर काम बिघडू शकते. बरेच लोक अशा काही वेळ थांबून नंतर पुढे जातात.
advertisement
6/6
दिवा आपोआप विझणे - घराबाहेर पडत असताना जळणारा दिवा अचानक विझला तर ते दुर्दैवाचे लक्षण मानले जाते. त्यावेळी काही वेळ थांबून देवाचे नामस्मरण करून पुन्हा निघावे.वैज्ञानिकदृष्ट्याला आधार नाही - या सर्व गोष्टींमध्ये काळजी घ्यावी पण, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. या गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होऊ शकत नाहीत, परंतु काहींच्या अनुभवावरून असे दिसून येते की, त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेकदा अडचणी निर्माण होतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Journey Astrology: अपघात होण्याआधीचे संकेत! प्रवासाला निघताना अशा गोष्टी दिसणं म्हणजे अपशकुन?