February 2026 Horoscope: फेब्रुवारीत शुभ योगांची मालिका! शुक्रादित्यसहित इतके शुभ योग 3 राशींच्या पत्थावर पडणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
February 2026 Horoscope: फेब्रुवारी महिना सुरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. पंचांगानुसार, या महिन्यात अनेक मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. ग्रहांच्या या स्थितीमुळे एकाच वेळी 4 शक्तिशाली राजयोग तयार होणार आहेत, ज्याचा प्रभाव सर्वसामान्यांच्या जीवनासह देश आणि जगावरही दिसून येईल.
advertisement
1/6

विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात लक्ष्मी नारायण राजयोग, शुक्रादित्य राजयोग, आदित्य मंगल राजयोग आणि बुधादित्य राजयोग निर्माण होतील. सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ यांच्या संयोगाने बनणारे हे योग काही राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन येणारे ठरू शकतात. यामुळे धनसंपत्तीत मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
advertisement
2/6
मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अत्यंत विशेष ठरू शकतो. हे चारही राजयोग तुमच्या उत्पन्नाच्या भावात तयार होत आहेत, ज्यामुळे तुमच्या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. तुम्ही एखादा नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करण्याचा विचार करू शकता.
advertisement
3/6
मेष राशीच्या लोकांना व्यवसायात एखादी मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रातही चांगले निकाल मिळतील आणि शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीतून फायदा होण्याचे संकेत आहेत.
advertisement
4/6
कन्या राशीच्या लोकांसाठी हे 4 राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतात. हे योग तुमच्या कुंडलीच्या सहाव्या भावात तयार होत असल्याने कायदेशीर प्रकरणांमध्ये दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. व्यापाराशी संबंधित लोकांचे उत्पन्न वाढेल. ज्या कामासाठी तुम्ही दीर्घकाळापासून प्रयत्न करत होतात, त्यात आता यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते आणि अचानक धनलाभाचे योगही तयार होत आहेत.
advertisement
5/6
कुंभ राशीसाठी हे 4 राजयोग शुभ संकेत देत आहेत. हे योग तुमच्या लग्न भावात तयार होत असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात मान-सन्मान मिळेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अधिक सुखकर होईल. तुमच्या कामाच्या पद्धतीत सुधारणा होईल आणि लोक तुमच्या प्रयत्नांचे कौतुक करतील.
advertisement
6/6
कुंभ राशीच्या लोकांची प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे आता वेगाने पुढे सरकतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होईल, अनेक इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
February 2026 Horoscope: फेब्रुवारीत शुभ योगांची मालिका! शुक्रादित्यसहित इतके शुभ योग 3 राशींच्या पत्थावर पडणार