TRENDING:

पहिल्या दिवशीच 60 कोटी पार! 'बॉर्डर 3' नंतर 'गदर 3' ही येणार, अमिषा पटेलनं दिली मोठी अपडेट

Last Updated:
नुकतीच बॉर्डर 3 सिनेमाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता सनी देओलचा गदर 3 ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री अमिषा पटेल हिनं सिनेमाबाबत मोठी हिंट दिली आहे.
advertisement
1/7
'बॉर्डर 3' नंतर 'गदर 3' ही येणार! अमिषा पटेलनं दिली मोठी अपडेट
सनी देओलचा 'बॉर्डर 2' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करतोय. तब्बल 29 वर्षांनी 'बॉर्डर 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉर्डर 2 बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतानाच निर्मात्यांनी 'बॉर्डर 3' येणार असल्याची घोषणा केली आहे. अशातच सनी देओलच्या कल्ट क्लासिक गदर सिनेमाचाही तिसरा पार्ट येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे.
advertisement
2/7
सनी देओलचा 'बॉर्डर 2' बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत या सिनेमाने भारतात 180 कोटी रुपयांची कमाई केली असून, वर्ल्डवाइड कलेक्शनने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.
advertisement
3/7
'बॉर्डर 2' च्या यशाचा आनंद साजरा होत असतानाच सनी देओल यांची ब्लॉकबस्टर फ्रँचायझी गदर बाबतही मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्री अमिषा पटेल हिने गदर 3 संदर्भात चाहत्यांना मोठा हिंट दिला आहे. इतकंच नाही तर तिने गदर 3 चा पहिल्या दिवशीचा कलेक्शनचा आकडाही सांगितला आहे.
advertisement
4/7
रविवारी संध्याकाळी अमिषा पटेलने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर Q&A सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं दिली. 'रेस 2'च्या आठवणींपासून ते बॉलिवूडमधील बदलत्या ट्रेंड्सपर्यंत अनेक विषयांवर अमिषाने भाष्य केलं. याच दरम्यान अनेक चाहत्यांनी तिच्या बॉलिवूडमधील कमबॅकबद्दल उत्सुकता व्यक्त केली.
advertisement
5/7
एका चाहत्याने थेट प्रश्न विचारला, "सगळे फॅन्स गदर 3ची वाट पाहत आहेत. तारा आणि सकीना ही जोडी पुन्हा कधी पाहायला मिळणार?" या प्रश्नावर अमिषाने दिलेलं उत्तर सध्या चांगलंच चर्चेत आहे.
advertisement
6/7
अमिषा म्हणाली, "माझ्यावर विश्वास ठेवा, जेव्हा कधीही गदर 3 मध्ये प्रेक्षक तारा-सकीनाची जोडी पाहतील तेव्हा देवाच्या कृपेने हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल. यावेळी सिनेमा बिग बजेट, मोठ्या स्केलवर आणि दमदार कंटेंटसह येईल. पहिल्याच दिवशी 60 कोटींपेक्षा जास्त कमाईचा मोठा धमाका होईल."
advertisement
7/7
2001 साली रिलीज झालेल्या झालेल्या गदर: एक प्रेम कथा या सिनेमाने वर्ल्डवाइड 132 कोटींची कमाई केली होती. तर 2023 मध्ये आलेल्या गदर 2 ने जगभरात तब्बल 691 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. सनी देओलचा तारा आणि अमिषा पटेलची जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पहिल्या दिवशीच 60 कोटी पार! 'बॉर्डर 3' नंतर 'गदर 3' ही येणार, अमिषा पटेलनं दिली मोठी अपडेट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल