टायर घासले अन् 27 प्रवाशांनी भरलेली बस पेटली, पहाटे 3 वाजता महामार्गावर भीषण दुर्घटना, PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेलगावजवळ ट्रॅव्हल्सला आग लागली, २७ प्रवासी सुखरूप बचावले, कपडे व दस्तऐवज जळाले, प्रशासनाने टायर घर्षण कारण मानले.
advertisement
1/6

रवी जयस्वाल, प्रतिनिधी जालना: रात्रीची शांत वेळ गाढ झोपेत असलेले २७ प्रवासी आणि अचानक मृत्यूने घातलेला विळखा! जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेलगावजवळ आज पहाटेच्या सुमारास एका खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. टायरच्या घर्षणामुळे लागलेल्या या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले आणि अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण बसचा कोळसा झाला.
advertisement
2/6
काळ आला होता पण वेळ आली नव्हती, म्हणूनच २७ प्रवासी या अग्नीतांडवातून सुखरूप बाहेर पडले. पहाटे ३ वाजेची वेळ होती. ट्रॅव्हल्स वेगाने संभाजीनगरच्या दिशेने धावत असताना अचानक टायरच्या घर्षणामुळे ठिणग्या उडाल्या आणि बसला खालून आग लागली.
advertisement
3/6
चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखून बस उभी केली आणि प्रवाशांना ओरडून उठवले. काही प्रवासी तर गाढ झोपेत होते, काय घडतंय हे समजण्यापूर्वीच बसमध्ये धुराचे लोट पसरले होते. एकमेकांना सावरत, आरडाओरडा करत प्रवाशांनी बसमधून बाहेर उड्या घेतल्या.
advertisement
4/6
प्रवासी जीव वाचवून खाली उतरले खरे, पण अवघ्या काही क्षणांत आगीच्या लोळांनी संपूर्ण बसला विळखा घातला. अनेकांचे कपडे, पैसे, दागिने आणि महत्त्वाचे दस्तऐवज बसमध्येच राहिले होते. स्वतःचा जीव वाचल्याचा आनंद एका बाजूला असला, तरी आपले सर्वस्व डोळ्यांदेखत जळताना पाहून अनेक प्रवाशांना अश्रू अनावर झाले.
advertisement
5/6
आगीची भीषणता इतकी होती की, दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश आले, पण तोपर्यंत ट्रॅव्हल्सचा फक्त सांगाडा उरला होता. शेलगाव परिसरात झालेल्या या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
advertisement
6/6
टायरच्या घर्षणामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला, अन्यथा पहाटेच्या या आगीत मोठी जीवितहानी झाली असती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
टायर घासले अन् 27 प्रवाशांनी भरलेली बस पेटली, पहाटे 3 वाजता महामार्गावर भीषण दुर्घटना, PHOTO