TRENDING:

Numerology: मोबाईल नंबरच्या शेवटी हे तीन क्रमांक असणं अनलकी! होता-होता कामं अडकून पडतात

Last Updated:
Numerology for Mobile Number: अंकशास्त्रानुसार मोबाईल नंबरचे महत्त्व खूप मोठे मानले जाते. आपल्या मोबाईल नंबरमधून बाहेर पडणारी ऊर्जा जीवनातील संप्रेषण, व्यवसाय आणि वैयक्तिक संबंधांवर परिणाम करते असे मानले जाते.
advertisement
1/7
मोबाईल नंबरच्या शेवटी हे तीन क्रमांक असणं अनलकी! होता-होता कामं अडकून पडतात
अंकशास्त्रानुसार, तुमचा मोबाईल नंबर केवळ 10 अंकी संख्या नसून, तो तुमच्या संवादाची ऊर्जा आणि तुमच्या भाग्याचे कंपन दर्शवतो. मोबाईलचा वापर आपल्या दैनंदिन जीवनातील जवळपास प्रत्येक कामासाठी होत असल्यानं, त्यातील अंकांची ऊर्जा तुमच्या आयुष्यावर परिणाम करते असे मानले जाते.
advertisement
2/7
आपला मोबाईल आणि मोबाईल नंबर आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. मोबाईलशिवाय आज-काल कोणाचं काहीच चालेना असं होतं. सगळ्या व्यवहारांमध्ये मोबाईल आवश्यक बाब बनला आहे. आपल्या मोबाईल नंबरशी निगडित सर्व गोष्टी असल्यानं अंकशास्त्रानुसार त्याचे विशेष महत्त्व आहे.
advertisement
3/7
अंकशास्त्रानुसार, मोबाईल नंबरमधील प्रत्येक अंकात एक विशेष ऊर्जा असते, ती आपल्या जीवनावर परिणाम करू शकते. विशेषतः मोबाईल नंबरचा शेवटचा अंक खूप महत्त्वाचा मानला जातो. अनेकांच्या बाबतीत असं बऱ्याचदा होतं की, होत आलेलं काम शेवटी अडतं. काम खूप चांगल्या पद्धतीनं सुरू असतं, परंतु शेवटच्या क्षणी काम बिघडतं किंवा थांबतंच.
advertisement
4/7
बऱ्याचदा यामागे मोबाईल नंबरमध्ये असलेल्या काही विशेष संख्यांचा परिणाम असू शकतो. विशेषतः तुमच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक लहान असेल. म्हणजे 1, 2, 3 इत्यादी, तर त्यामुळं बरीच कामे शेवटच्या टप्प्यावर येऊन अडकू शकतात.
advertisement
5/7
अंकशास्त्रज्ञ अंशुल त्रिपाठी सांगतात, मोबाईल नंबर 8, 9, 7 सारख्या मोठ्या संख्येने सुरू होणारे असतील तर त्यामुळे कामाच्या सुरुवातीला ऊर्जा आणि परिणाम चांगले असतात. पण जर शेवटी लहान संख्या असतील तर काम बिघडू शकते किंवा शेवटच्या क्षणी अडकू शकते किंवा वारंवार अडचणी येऊ शकतात. त्यामुळे खूप कष्ट करूनही शेवटच्या टप्प्यावर अपयश येतं.
advertisement
6/7
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक संख्येचे एक स्वरूप असून ते आपल्या सर्व गोष्टींवर निर्णयांवर देखील परिणाम करते. मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 6, 8 किंवा 9 सारखा मोठा अंक असल्यास कामाला ताकद आणि स्थिरता देण्यास मदत मिळते. यासोबतच, त्यात निर्णय घेण्याची, स्थिरता आणण्याची आणि काम शेवटापर्यंत नेण्याची क्षमता असते.
advertisement
7/7
समजा एखाद्याच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 1 किंवा 2 आहे. तर या व्यक्तीला वारंवार कामे शेवटच्या टप्प्यात जाऊन अडकण्याचे अनुभव येतात. असे छोटे अंक त्यामागील कारण असू शकता. जर एखाद्याचा मोबाई क्रमांक ८९६७XXXX८९ असेल, तर हा क्रमांक स्थिरता आणि ताकद दर्शवितो. कारण शेवटी 9 हा मोठा क्रमांक आला आहे, त्यामुळे आयुष्यात लवकर यश मिळते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: मोबाईल नंबरच्या शेवटी हे तीन क्रमांक असणं अनलकी! होता-होता कामं अडकून पडतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल