TRENDING:

August Horoscope: नोकरी-व्यवसायात जबरदस्त तेजी! ऑगस्टमध्ये तीन ग्रहांची चाल या 4 राशींना खुश करणार

Last Updated:
August Horoscope: ऑगस्ट महिना सुरू झाला असून या महिन्यात आपल्याला सूर्य, बुध आणि शुक्र ग्रहांच्या स्थितीत बदल दिसून येतील. ९ ऑगस्ट २०२५ रोजी बुधाचा उदय होणार आहे. तसेच, याच्या दोन दिवसांनी, म्हणजे ११ ऑगस्ट रोजी बुध ग्रह सरळ मार्गी होईल. १७ ऑगस्ट रोजी सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करेल, तर २१ ऑगस्ट रोजी शुक्र कर्क राशीत येईल. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी बुधाचा अस्त होईल. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी बुध सिंह राशीत प्रवेश करेल. ऑगस्टमध्ये या संक्रमणांमुळे कोणत्या राशींना जबरदस्त लाभ होणार आहे, त्याविषयी जाणून घेऊ. 
advertisement
1/5
नोकरी-व्यवसायात जबरदस्त तेजी! ऑगस्टमध्ये तीन ग्रहांची चाल या 4 राशींना खुश करणार
ऑगस्ट महिन्यात अनेक ग्रहांचे महत्त्वाचे गोचर होणार आहेत. सूर्य, बुध, शुक्र, शनि आणि मंगळ हे ग्रह आपापल्या राशी बदलतील, ज्यामुळे सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होईल. ऑगस्ट महिना हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्यात अनेक महत्त्वाचे ग्रह आपली राशी बदलतात. या महिन्यामध्ये सिंह आणि कन्या या दोन राशींचा प्रभाव दिसून येतो.
advertisement
2/5
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्टमधील ग्रहांचे संक्रमण फायदेशीर ठरेल. या संक्रमणांमुळे मेष राशीच्या लोकांचे नशीब चमकेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल.
advertisement
3/5
कर्क राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना अतिशय उत्तम राहणार आहे. मेहनत फळ देईल. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात असलेल्या लोकांना मोठा प्रकल्प मिळू शकतो. कित्येक दिवसांपासून प्रयत्न करत असलेल्यांना नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. कर्क राशीच्या काहींना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
advertisement
4/5
मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना सुवर्णकाळ असू शकतो. ऑगस्टमधील ग्रहांची चाल मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. जे काम खूप दिवसांपासून रखडले होते ते पूर्ण होण्यास सुरुवात होईल. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय चमकेल. तुम्हाला प्रत्येक कामात कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
advertisement
5/5
कुंभ राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. कुंभ राशीचे जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या महिन्यात यश मिळू शकते. मनासारखी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑगस्टमध्ये वेळ खूप चांगला जाणार आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
August Horoscope: नोकरी-व्यवसायात जबरदस्त तेजी! ऑगस्टमध्ये तीन ग्रहांची चाल या 4 राशींना खुश करणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल