TRENDING:

ग्रह बदलणार चाल! मकर संक्रांतीला 'या' 3 राशींच्या लोकांचं चमकणार नशीब, मिळणार गुड न्यूज

Last Updated:
हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष आध्यात्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व आहे. 14 जानेवारी 2026 रोजी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील, ज्याला 'मकर संक्रांत' म्हटले जाते. सूर्यदेवाच्या या संक्रमणामुळे 'धनु' राशीतून बाहेर पडून ते आपल्या पुत्राच्या म्हणजेच शनीच्या राशीत प्रवेश करतील.
advertisement
1/7
मकर संक्रांतीला 'या' 3 राशींच्या लोकांचं चमकणार नशीब, मिळणार गुड न्यूज
हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष आध्यात्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व आहे. 14 जानेवारी 2026 रोजी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील, ज्याला 'मकर संक्रांत' म्हटले जाते. सूर्यदेवाच्या या संक्रमणामुळे 'धनु' राशीतून बाहेर पडून ते आपल्या पुत्राच्या म्हणजेच शनीच्या राशीत प्रवेश करतील.
advertisement
2/7
ग्रहांच्या या बदलामुळे 'त्रिग्रही योग' निर्माण होत असून, याचा सकारात्मक परिणाम सर्व राशींवर होईल. मात्र, 3 राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हा काळ अत्यंत भाग्योदयाचा ठरणार आहे.
advertisement
3/7
मेष : करिअरमध्ये सुवर्णसंधी सूर्यदेवाचे संक्रमण मेष राशीच्या व्यक्तींसाठी करिअरमध्ये प्रगती घेऊन येईल. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीमध्ये पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे.
advertisement
4/7
सिंह : मान-सन्मानात वाढ सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य आहे. मकर संक्रांतीनंतर सिंह राशीच्या जातकांच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याचे योग आहेत. आरोग्याशी संबंधित तक्रारी दूर होतील.
advertisement
5/7
वृश्चिक : आर्थिक लाभ आणि गुड न्यूज वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांत आर्थिक सुबत्ता घेऊन येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि मुलांकडून एखादी 'गुड न्यूज' मिळू शकते. जे लोक परदेशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.
advertisement
6/7
त्रिग्रही योगाचा प्रभाव: या वर्षी मकर संक्रांतीला सूर्य, बुध आणि शनीचा दुर्मिळ संयोग पाहायला मिळणार आहे. हा संयोग व्यावसायिक आणि व्यापार करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. विशेषतः लोखंड, तेल आणि राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे यश मिळेल.
advertisement
7/7
रखडलेली कामे होतील पूर्ण: मकर संक्रांतीपासून 'उत्तरायण' सुरू होते, ज्याला देवांचा काळ मानले जाते. या शुभ काळात ग्रहमान अनुकूल झाल्यामुळे कायदेशीर कचाट्यात अडकलेली कामे किंवा मालमत्तेचे वाद तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ग्रह बदलणार चाल! मकर संक्रांतीला 'या' 3 राशींच्या लोकांचं चमकणार नशीब, मिळणार गुड न्यूज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल