Numerology: परिस्थिती चांगली-वाईट कशीही असो! जोडीदार म्हणून 'या' जन्मतारखांचे लोक उत्तम साथ देतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Perfect Partners Numerology: अंकशास्त्रात जन्मतारखेच्या माध्यमातून तुम्ही समोरच्या व्यक्तीचे गुण, दोष आणि स्वभाव याबद्दल नीट जाणून घेऊ शकता. जन्मतारखेवरून तुम्ही सहजपणे मूलांक काढू शकता. प्रत्येक माणसाचा मूलांक त्याच्या स्वभावाबद्दल, विचारसरणीबद्दल आणि नातेसंबंध निभावण्याच्या पद्धतीबद्दल बरंच काही सांगत असतो.
advertisement
1/7

काही मूलांकाचे लोक नात्यात अत्यंत प्रामाणिक, समजूतदार आणि मनापासून साथ देणारे असतात. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुमचा हात धरून राहतात. प्रेम असो, वाद असो किंवा कठीण काळ, या मूलांकांचे लोक कधीही साथ सोडत नाहीत. जाणून घेऊया कोणते मूलांक परफेक्ट लाइफ पार्टनर मानले जातात आणि का.
advertisement
2/7
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक 2 असतो. हा मूलांकावर चंद्राचा प्रभाव असतो. त्यामुळे या लोकांच्या स्वभावात शांतता, कोमलता आणि भावुकता असते. मूलांक 2 च्या व्यक्ती नात्यांना खूप गांभीर्याने घेतात. त्यांना आपल्या जोडीदाराच्या आनंदातच स्वतःचा आनंद दिसतो.
advertisement
3/7
मूलांक 2 चे लोक खूप काळजी घेणारे असतात आणि कोणत्याही नात्यात संतुलन राखण्यात पटाईत असतात. जरी भांडण झालं तरी हे लोक स्वतः पुढं येऊन नातं सावरतात. यांचं मन साफ असतं आणि आपल्या जोडीदाराबद्दल त्यांच्या मनात नेहमीच एक हळवेपणा असतो. म्हणूनच त्यांना खूप चांगले लाइफ पार्टनर मानलं जातं. या मूलांकाचे लोक नेहमी आपल्या जोडीदाराला प्राधान्य देतात आणि नंतर इतरांचं ऐकतात.
advertisement
4/7
तसेच ज्यांचा जन्म 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 5 असतो आणि हा बुध ग्रहाचा अंक आहे. बुध ग्रह या लोकांना कुशाग्र बुद्धिमत्ता आणि उत्तम संवाद कौशल्य देतो. नात्यामध्ये हे लोक खूप रोमँटिक आणि काळजी घेणारे ठरतात. आपल्या जोडीदाराला प्रेम आणि मान-सन्मान कसा द्यायचा हे त्यांना चांगलं ठाऊक असतं.
advertisement
5/7
मूलांक 5 चे लोक नात्याला कधीही ओझं बनू देत नाहीत, उलट ते नातं नेहमी आनंदी ठेवतात. त्यांच्यात विनोदी स्वभावही असतो आणि समजूतदारपणाही, ज्यामुळे नातं अधिक सुंदर होतं. बुध ग्रहामुळे मूलांक 5 चे लोक आपल्या जोडीदाराला नेहमी खूश ठेवतात आणि आपल्या बोलण्याने सर्वांना प्रभावित करतात.
advertisement
6/7
ज्या लोकांचा जन्म 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 6 असतो आणि याचा स्वामी शुक्र ग्रह आहे. शुक्र हा सौंदर्य, आकर्षण आणि प्रेमाचा कारक मानला जातो. मूलांक 6 चे लोक स्वभावाने खूप आकर्षक, भावूक आणि मनापासून प्रेम करणारे असतात. त्यांना नात्यात सौंदर्य, सुसंवाद आणि स्थिरता खूप आवडते.
advertisement
7/7
मूलांक 6 चे लोक आपल्या जोडीदाराला फक्त प्रेमच देत नाहीत तर त्यांना योग्य तो सन्मानही देतात. हे लोक खूप जबाबदार असतात आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या जोडीदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्यामध्ये रोमान्स, समजूतदारपणा आणि संवेदनशीलता हे तिन्ही गुण भरपूर प्रमाणात असतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: परिस्थिती चांगली-वाईट कशीही असो! जोडीदार म्हणून 'या' जन्मतारखांचे लोक उत्तम साथ देतात