ShaniDev: मागं तसं पुढं, यंदाही झोळी रिकामीच! पूर्ण वर्ष 2026 दोन राशीच्या लोकांना त्रास-संकटाचे
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Astrology: काहीही बदलणार नाही परिस्थिती जैसे-थे राहणार आहे. काही राशींच्या जीवनात सुरू असलेले त्रास इतक्यात कमी होण्याची शक्यताच नाही. नवीन वर्ष 2026 कडून फारशा चांगल्या अपेक्षा ठेवण्याची गरज नाही. शनिची अडीचकी सध्या ज्या दोन राशींवर सुरू आहे, त्यांच्यासाठी नवीन वर्षात फारसं वेगळं चांगलं काही घडण्याची शक्यता दिसत नाही.
advertisement
1/8

नव्या वर्षात शनिच्या स्थिती फारसा बदल होणार नाही. जुलै 2026 मध्ये शनी फक्त एकदाच सरळ असलेला वक्री होईल. वर्ष 2025 प्रमाणेच अडीचकीमुळे दोन राशीच्या लोकांच्या त्याच अडचणी या वर्षात कायम राहतील, यासाठी या राशीच्या लोकांनी हनुमान पूजा आणि हनुमान चालिसा याचा नित्य आधार घेतला तर होणार त्रास कमी असतील.
advertisement
2/8
आपण चर्चा करत असलेल्या दोन राशी म्हणजे सिंह आणि धनु रास. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, शनीच्या अडीचकीचा प्रभाव वर्षभर या राशींवर राहील. परिणामी, त्यांचे खर्च वाढतील. मानसिक चिंता कायम राहील आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नवीन वर्षात शनीच्या अडीचकीचा या दोन राशींवर कसा परिणाम होईल ते जाणून घेऊया.
advertisement
3/8
सिंह - शनिच्या अडीचकीचा प्रभाव तुमचे अनावश्यक खर्च वाढवेल. परिणामी तुमचे आर्थिक नियोजन बिघडू शकते, अडचणी वाढू शकतात. या राशीच्या लोकांनी गुंतवणूक आणि खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा, तुमच्या बँक बॅलन्स आणि बजेटवर परिणाम होऊ शकतो.
advertisement
4/8
मानसिक ताण - सिंह राशीच्या लोकांसाठी वर्ष 2026 मानसिक ताणाचे वर्ष ठरू शकते. तुम्हाला नाहक भीती, चिंता सतावेल, निर्णय घेताना अडचण येईल. कामात आत्मविश्वासाचा राहणार नाही. तुम्हाला थकवा, अशक्तपणा किंवा जुनाट आजारांचा अनुभव येऊ शकतो.
advertisement
5/8
प्रवासात सावधगिरी - अडीचकी तुमच्या प्रवासावरही परिणाम पाडू शकते. छोटा किंवा लांबच्या प्रवासात निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते. या वर्षात सिंह राशीच्या राशीच्या लोकांनी प्रवासामध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा. इतरांची वाहने चालवू नका.
advertisement
6/8
धनू - अडीचकीचा धनू राशीवरही परिणाम आहे. अडीचकीमुळे अनावश्यक खर्चात वाढ दिसून येऊ शकते. या काळात केलेल्या गुंतवणुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये अडचणी येऊ शकतात. खर्चाचे नियोजन करणे योग्य ठरेल.
advertisement
7/8
आरोग्य समस्या - नवे वर्ष आरोग्यासाठी सावधगिरीचा काळ असेल. मानसिक आणि शारीरिक कमकुवतपणा वाढू शकतो. आजारांपासून सावध रहा. वाढत्या ताणामुळे तुमच्या झोपेवर आणि दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होऊ शकतो. संतुलित आहार, व्यायाम आणि मानसिक शांततेवर लक्ष केंद्रित करा.नातेसंबंध ताणले जाऊ शकतात
advertisement
8/8
धनू राशीचे मित्र आणि नातेवाईकांशी मतभेद वाढतील. सासरच्या लोकांशी संवाद बराच काळ होणार नाही. तुमच्या वैवाहिक जीवनातील आनंदावरही परिणाम होऊ शकतो. मुले तुम्हाला चिंतेत टाकू शकतात. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून तुमच्या असुरक्षिततेचा फायदा घेऊन तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: मागं तसं पुढं, यंदाही झोळी रिकामीच! पूर्ण वर्ष 2026 दोन राशीच्या लोकांना त्रास-संकटाचे