Morning Mantra: बुधवारचे पॉवरफुल मंत्र! या 5 पैकी एकाचं पठणसुद्धा दिवसभर कामात शुभ परिणाम देईल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Morning Mantra : बुधवारचा दिवस श्रीगणेशाच्या पूजेसाठी खास मानला जातो. जे भाविक-भक्त या दिवशी गणपती बाप्पाची खऱ्या मनाने पूजा करतात, त्यांना श्री गणेशाचे आशीर्वाद मिळतातच शिवाय कुंडलीत बुध ग्रहाचे स्थानही शक्तिशाली होते. धार्मिक शास्त्रांनुसार, या दिवशी श्री गणेशाची विशेष पूजा केल्यानं बुद्धी तीक्ष्ण होते, ज्यामुळे व्यक्ती आपल्या सर्व कामात यश मिळवू शकते. आज आपण श्री गणेशाच्या काही मंत्रांबद्दल जाणून घेऊ, ज्यांचा बुधवारी जप करणे खूप शुभ मानले जाते.
advertisement
1/6

बुधवारचे शक्तिशाली मंत्र -1.ऊँ वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटि समप्रभ:।निर्विघ्नं कुरू मे देव, सर्व कार्येषु सर्वदा।।बुधवारच्या दिवशी किमान 11 वेळा हा मंत्र जप करा, यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल.
advertisement
2/6
2. ॐ एकदन्ताय विद्धमहे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्॥या मंत्राला श्री गणेशाचा गायत्री मंत्र म्हणून ओळखले जाते. जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असल्यास बुधवारी या मंत्राचा 11 वेळा जप करा. यामुळे तुमची स्थिती चांगलीच सुधारू लागेल.
advertisement
3/6
3. गजाननं भूत गणादि सेवितं कपित्थ जम्बू फल चारूभक्षणं।उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्रेश्वरपादपंकजम।।बुधवारी या मंत्राचा जप केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि जीवनातील अनेक ताणतणाव देखील कमी होतात.
advertisement
4/6
4. ॐ नमो विघ्नहराय गं गणपतये नम:।या मंत्राचा जप केल्यानं श्री गणेशाचे विशेष आशीर्वाद मिळतात.
advertisement
5/6
5. ॐ गं गणपतये नमः ।।श्री गणेशाच्या बीज मंत्राचा जप केल्यानं बुद्धिमत्ता विकसित होते आणि ज्ञान प्राप्त होते. या मंत्रामुळे सर्व कार्यात यश मिळते, असे मानले जाते.
advertisement
6/6
श्री गणेशाच्या मंत्रांचा जप करण्याची पद्धत -ज्या जप माळेने तुम्ही मंत्राचा जप करणार आहात ती जपमाळ शुद्ध करावी.मंत्र जप करण्यापूर्वी आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला.त्यानंतर गणेशाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा.ज्या कार्यासाठी तुम्ही मंत्र जप करणार आहात, त्याच्या यशासाठी संकल्प करा.मंत्रांचा जप मंद आवाजात आणि पूर्ण शुद्धतेने करावा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Morning Mantra: बुधवारचे पॉवरफुल मंत्र! या 5 पैकी एकाचं पठणसुद्धा दिवसभर कामात शुभ परिणाम देईल