TRENDING:

Astrology: सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पुन्हा दु:खाचे दिवस! राहु-चंद्र युतीमुळे या राशीच्या लोकांवर ग्रहण

Last Updated:
Astrology: पंचांगानुसार, ग्रहांचे सतत होणारे राशीपरिवर्तन किंवा स्थिती यामुळे शुभ-अशुभ योग निर्माण होत राहतात. ज्याचा परिणाम संपूर्ण राशीचक्रावर दिसून येतो. 06 सप्टेंबर रोजी चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार असून त्याठिकाणी आधीच राहू आहे.
advertisement
1/6
सप्टेंबरच्या सुरुवातीलाच दु:खाचे दिवस! राहु-चंद्र युतीमुळे या राशींवर ग्रहण
राहू आणि चंद्राची कुंभ राशीत युती होणार आहे. त्यामुळे ग्रहण योग तयार होत आहे. या योगाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. परंतु 3 राशीच्या लोकांना अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कारण पैशाचे नुकसान आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत.
advertisement
2/6
तूळ रास - ग्रहण योग तूळ राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीतून राहू आणि चंद्राचा युती सहाव्या स्थानावर तयार होईल. त्यामुळे या काळात गुप्त शत्रू तुम्हाला थोडे त्रास देऊ शकतात. तसेच, महत्त्वाचे काम थांबू शकते. त्याच बरोबर आरोग्याची काळजी घ्या. या काळात आर्थिक बाबतीत चढ-उतार येतील, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा आणि नियोजनबद्ध पद्धतीनं पुढं जा.
advertisement
3/6
सिंह रास - ग्रहण योग सिंह राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल ठरू शकते. कारण राहू आणि चंद्राची युती तुमच्या राशीपासून आठव्या घरात असेल. त्यामुळे यावेळी सर्दी, ताप येऊ शकतो. त्याच वेळी तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही त्रास होऊ शकतो.
advertisement
4/6
सिंह - ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी सर्वजण तुमच्या कामावर लक्ष ठेवून असतील, म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर सल्ला घेतल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वाहन काळजीपूर्वक चालवा.
advertisement
5/6
मीन रास - ग्रहण योग मीन राशीच्या लोकांसाठी थोडे हानिकारक ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीपासून बाराव्या घरात असेल. ज्यामुळे या काळात तुमचा अनावश्यक खर्च होऊ शकतो. तसेच, या काळात तुम्हाला मानसिक ताण येईल. सध्याच्या काळात कोणतीही डील फायनल करणे टाळा, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
मीन राशीच्या लोकांनी या दिवशी गुंतवणूक करणे टाळा आणि आवश्यक असल्यास अनुभवी व्यक्तीशी सल्लामसलत करूनच कोणताही निर्णय घ्या. प्रवास शक्यतो टाळावा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पुन्हा दु:खाचे दिवस! राहु-चंद्र युतीमुळे या राशीच्या लोकांवर ग्रहण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल