Shani Vakri 2025: शनिचा वक्री काळ 4 राशींसाठी वरदान! जुलैपासून थेट नोव्हेंबरपर्यंत नॉनस्टॉप पैसा येणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Vakri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, एक मोठी घटना लवकरच घडणार आहे. शनि मीन राशीत वक्री होणार आहे. १३ जुलै रोजी सकाळी ९:३६ वाजता शनि मीन राशीत वक्री होईल. १३ जुलै ते २८ नोव्हेंबर या कालावधीत तो वक्री असेल.
advertisement
1/5

म्हणजे १३८ दिवस शनि मीन राशीत वक्री राहील. वक्री शनि सर्व १२ राशींवर परिणाम दाखवेलच, परंतु शनीचा वक्री काळ ४ राशींच्या लोकांसाठी फार शुभ ठरू शकतो. जाणून घेऊया कोणत्या ४ राशींसाठी वक्री शनि शुभ राहणार आहे?
advertisement
2/5
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचा वक्री काळ शुभ ठरू शकतो. करिअरच्या दृष्टिकोनातून, वक्री शनि तुम्हाला यश देईल. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्ही केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ तुम्हाला मिळणार आहे. कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात धीर धरा, राग घात करू शकतो. नातेसंबंधांसाठी, प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. अहंकार कोणत्याही गोष्टीत येऊ देऊ नका.
advertisement
3/5
मकर: तुमच्या राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. शनीची वक्री गती तुम्हाला आत्म-विश्लेषणाची संधी देणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या जुन्या कामांचा आढावा घ्याल. भरपूर कष्ट केलं तर तुमचे काम यशस्वी होईल, तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकतील. काम प्रामाणिकपणे करा. जर काही समस्या उद्भवली तर तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला घ्यावा.
advertisement
4/5
कुंभ: तुमच्या राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. मीन राशीत शनि वक्री असल्याने या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. तुम्ही उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करू शकता. पैशाच्या आगमनाने मन आनंदी होईल. हे १३८ दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. शनीच्या कृपेने तुमचे काम यशस्वी होईल. जुना मित्र तुम्हाला मदत करेल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमचे मनोबल मजबूत ठेवा.
advertisement
5/5
मीन: तुमच्या राशीचा स्वामी गुरु आहे आणि शनीची वक्री गती तुमच्या राशीतच सुरू होणार आहे. या काळात तुम्ही आत्म-विश्लेषण करावे. तुम्ही नवीन काम सुरू करू शकता, परंतु त्याच्या सर्व पैलूंचा नीट विचार करा. या काळात पूजा, पठण, ध्यान, योग इत्यादी केले तर तुम्हाला फायदा होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Vakri 2025: शनिचा वक्री काळ 4 राशींसाठी वरदान! जुलैपासून थेट नोव्हेंबरपर्यंत नॉनस्टॉप पैसा येणार