TRENDING:

ShaniDev: आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जबरदस्त! शनिदेव मेहरबान असल्यानं अजून 2 वर्षे या राशींना चिंताच नाही

Last Updated:
Shani Astrology: सर्व ग्रहांमध्ये शनी सर्वात मंद गतीने आपली राशी बदलतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात. अशा प्रकारे संथ गतीनं त्याचे राशीचक्र 30 वर्षांनी पूर्ण होते. सध्या शनिदेव मीन राशीत विराजमान असून चांदीच्या पायांनी तीन राशींवर कृपा करत आहेत. 
advertisement
1/5
आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जबरदस्त! शनिदेव मेहरबान असल्यानं 2 वर्षे या राशींचेच
शनिदेव हे कर्माचे फळ देणारे (कर्मफळ दाता) मानले जातात. याचा अर्थ, तुम्ही जसे कर्म कराल, त्यानुसार शनिदेव तुम्हाला चांगले किंवा वाईट फळ देतात. त्यामुळे त्यांची कृपा मिळवण्यासाठी चांगले कर्म करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
advertisement
2/5
ज्योतिषशास्त्रानुसार, येणारी दोन वर्षे या तीन राशींसाठी खूप अद्भुत असतील. कुंडलीत शनीची स्थिती मजबूत असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शनिचे चांदीचे पाय कोणत्या राशींवर चालत आहेत, याविषयी जाणून घेऊ
advertisement
3/5
कर्क - शनिदेव सध्या कर्क राशीवर चांदीच्या पायांनी चालत आहे, ज्यामुळे या राशींना चांगला काळ जात आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणी-त्रासांपासून तुम्हाला दिलासा मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जबरदस्त चांगली असेल. नोकरीच्या ऑफर येतील. प्रेम जीवनही चांगले राहील. व्यवसाय चांगला चालेल. २०२७ पर्यंतचा काळ तुमच्यासाठी चांगला आहे.
advertisement
4/5
वृश्चिक - शनिदेव सध्या चांदीच्या पायांनी वृश्चिक राशीवर चालत आहे. अशा परिस्थितीत २०२७ पर्यंतचा काळ या राशीच्या लोकांसाठी देखील चांगला आहे. कुंडलीत शनीची स्थिती मजबूत असल्यानं हा काळ तुम्हाला खूप प्रगती करण्यास मदत करेल. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या पगारात अचानक वाढ होऊ शकते. शेअर बाजारात तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल.
advertisement
5/5
कुंभ - कुंभ राशीवर आता शनि चांदीच्या पायांनी चालत आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठीही हा काळ खूप चांगला आहे. तुमच्या नोकरीत अचानक बदल होऊ शकतो. तुम्हाला आर्थिक संकटातून दिलासा मिळू शकतो. नवीन मोठ्या पगाराच्या नोकरीच्या ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जबरदस्त! शनिदेव मेहरबान असल्यानं अजून 2 वर्षे या राशींना चिंताच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल