TRENDING:

Astrology: हातात पैसा-पॉवर येणार! या राशींची धन कमाई अनपेक्षित वाढणार; सुख-संपत्तीचा कारक प्रसन्न

Last Updated:
Shurka Uday 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा धन, समृद्धी, आनंद, सौंदर्य, विलास, प्रेम, आकर्षण इत्यादींचा कारक मानला जातो. त्याला दैत्यगुरू मानले जाते. शुक्राच्या ग्रह स्थितीत होणारा बदल निश्चितच 12 राशींच्या जीवनावर परिणाम करतो. संपत्तीचा कारक मानला जाणारा शुक्र मीन राशीत विराजमान आहे. त्याची ही स्थिती एका विशिष्ट कालावधीनंतर बदलेल.
advertisement
1/7
हातात पैसा-पॉवर! या राशींची धन कमाई अनपेक्षित वाढणार; सुख-संपत्तीचा कारक प्रसन्न
धूलिवंदननंतर शुक्राचा अस्त होईल आणि 23 मार्च रोजी सकाळी 05:49 वाजता तो उदय स्थितील येईल. विशेष म्हणजे त्याच्या उच्च राशी मीन राशीत त्याचा उदय होणार असल्यानं मालव्य राजयोग निर्माण होईल.
advertisement
2/7
सुख-संपत्तीचा कारक शुक्राच्या या रिस्थितीचा काही राशींना भरपूर लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया या भाग्यवान राशींबद्दल. मालव्य राजयोगाचा कोणत्या राशींना फायदा होईल.
advertisement
3/7
धनु - या राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचा उदय आणि मालव्य राजयोगाची निर्मिती अनुकूल ठरू शकते. या राशीच्या चौथ्या घरात शुक्र ग्रहाचा उदय होईल. अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांच्या सुखसोयींमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते.
advertisement
4/7
धनु - आपले वाहन, कार, मालमत्ता किंवा घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आयुष्यात आनंद वाढणारा काळ असेल. कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. यासोबतच मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही यश मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. यासोबतच पालक आणि गुरुवर्यांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होतील.
advertisement
5/7
मिथुन - या राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचा उदय आणि मालव्य राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांना त्यांच्या कामात चांगली प्रगती दिसेल. मुलांचा विकास पाहून तुम्हाला समाधान वाटेल. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात.
advertisement
6/7
मिथुन - याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. पण, अनावश्यक खर्चामुळे तुम्ही बैचेन होऊ शकता. अशा परिस्थितीत खर्चावर थोडे नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. हा काळ नातेसंबंधांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
7/7
मकर - या राशीत शुक्र तिसऱ्या भावात उगवेल. त्यामुळे या राशीच्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमुळे खूप यशस्वी होऊ शकता. बऱ्याच काळापासून कोणत्याही कामावर कठोर परिश्रम करत असाल तर आता तुम्हाला त्यात यश मिळू शकते. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला महत्त्वाचे बदल दिसू शकतात. आरोग्य चांगले राहणार आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: हातात पैसा-पॉवर येणार! या राशींची धन कमाई अनपेक्षित वाढणार; सुख-संपत्तीचा कारक प्रसन्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल