TRENDING:

Swapna Shastra: नक्कीच शुभ संकेत समजावेत..! पहाटेच्या वेळी स्वप्नात अशा गोष्टी भाग्यवानांना दिसतात

Last Updated:
Swapna Shastra : झोपेत स्वप्न पडणं ही सर्वसाधारण बाब आहे, आपल्याला झोपेत कधीही स्वप्न दिसतं. काही स्वप्ने आपण सहज विसरून जातो पण काही स्वप्ने चांगलीच लक्षात राहतात. ज्योतिष आणि स्वप्न शास्त्रानुसार, आपण जे काही स्वप्न पाहतो त्यांचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. विशेषतः सूर्योदयापूर्वीच्या ब्रह्म मुहूर्तावर (सकाळी 3:30 ते 5:30) पडलेली स्वप्नं खूप खास मानली जातात. या पवित्र काळात पाहिलेली स्वप्नं खरी होण्याची शक्यता जास्त असते, ती भविष्यातील शुभ संकेतांची माहिती देतात. ब्रह्म मुहूर्तावर कशा प्रकारची स्वप्नं पाहणं शुभ मानलं जातं.
advertisement
1/5
नक्कीच शुभ संकेत समजावेत! पहाटेच्या वेळी स्वप्नात अशा गोष्टी भाग्यवानांना दिसतात
स्वप्नात देव, मंदिर किंवा पवित्र मूर्ती दिसणे - स्वप्नात देव, मंदिर किंवा एखादी पवित्र मूर्ती दिसली तर तो नशीब चमकण्याचा संकेत मानला जातो. तुमच्या कामात तुम्हाला लवकरच यश मिळेल आणि देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. हा मनाची शांती आणि प्रगतीचा सुद्धा संकेत आहे.
advertisement
2/5
स्वप्नात स्वच्छ वाहते पाणी, नदी किंवा समुद्र पाहणं हे आर्थिक फायद्याचं लक्षण आहे. तुमच्या पैशांच्या अडचणी दूर होतील आणि अचानक धनलाभ होऊ शकतो. आयुष्यात नवीन ऊर्जा आणि ताजेपणा येईल.
advertisement
3/5
ब्रह्म मुहूर्तावर पांढरा हत्ती, पांढरी गाय किंवा पांढरा घोडा पाहणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि नोकरीत उच्च पद मिळेल. जर गाय दिसली तर तो लक्ष्मी येण्याचा संकेत आहे. हिरवीगार झाडं किंवा फळांनी लगडलेली झाडं दिसणं हे समृद्धीचं लक्षण आहे. तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे आणि ज्यांना अपत्यप्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असू शकते.
advertisement
4/5
स्वप्नात जळता दिवा किंवा यज्ञाचा अग्नी दिसणं हे ज्ञान वाढण्याचं आणि यशाचं प्रतीक आहे. यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होतील आणि एक नवीन प्रकाश मिळेल. स्वप्नात उमलेलं कमळ किंवा सुंदर बाग पाहणं हे मनातील इच्छा पूर्ण होण्याचा संकेत आहे. हे सुख आणि समाधानाचं सुद्धा प्रतीक आहे. ब्रह्म मुहूर्तावरील स्वप्नं तुमच्या मनातील आध्यात्मिक शक्ती दर्शवतात.
advertisement
5/5
असे शुभ दर्शन झाल्यावर मनात चांगले विचार ठेवावेत, ज्यामुळे स्वप्नांचं फळ लवकर आणि पूर्णपणे मिळतं. स्वप्न शास्त्र असं सांगतं की, स्वप्न पाहिल्यानंतर ते सगळ्यांना सांगू नये. विशेषतः ब्रह्म मुहूर्तावरील शुभ स्वप्नं गुप्त ठेवल्यानं त्यांची सकारात्मक ऊर्जा वाढते. अशी स्वप्नं पडली तर देवाचे आभार मानणं चांगलं असतं.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Swapna Shastra: नक्कीच शुभ संकेत समजावेत..! पहाटेच्या वेळी स्वप्नात अशा गोष्टी भाग्यवानांना दिसतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल