Astrology: भयंकर अडचणींमधून मार्ग काढले! या 5 राशींचे आता चमकणार नशीब; कष्टाला बुध-गुरुची साथ
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 05, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
advertisement
1/12

मेष (Aries) : आज शुक्रवारचा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल जाणवतील. आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे तुम्हाला नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. नात्यात आपुलकी आणि प्रेम असेल. काही काळापासून एखादा मित्र किंवा प्रिय व्यक्तीपासून दूर असाल, तर त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याची योग्य वेळ आहे. ध्यान आणि योगासनं केल्याने आत्मिक शांतता मिळेल. सर्जनशीलतेचा योग्य वापर करून व्यवसायात यशस्वी होऊ शकता.Lucky Number : 9Lucky Color : Purple
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा असेल. दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या कामांना पुढे नेऊ शकता. सोशल नेटवर्कमध्ये सुधारणा होईल. आजचा दिवस कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी अनुकूल आहे. आर्थिक बाबतीत सावध राहा आणि अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक स्थिती मजबूत करण्याची गरज आहे. कष्ट आणि समर्पणामुळे यश मिळेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगासनं करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा. हा दिवस नवीन शक्यता आणि आनंदाने भरलेला असेल.Lucky Number : 2Lucky Color : Dark Green
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : आज शुक्रवारचा दिवस तुमच्यासाठी कल्पना आणि संवादाचा असेल. तुमच्या सूचना लोकांना प्रभावित करतील कारण, तुम्ही कल्पना स्पष्टपणे मांडण्यात कुशल आहात. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने समाधान मिळेल. जर तुम्ही नवीन नातेसंबंध सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. सहलीचं नियोजन केल्याने किंवा एखादा छंद पूर्ण केल्याने मनाला उभारी मिळेल. आरोग्याबाबत जागरूक राहा. योगासनं आणि ध्यानामुळे मानसिक शांती मिळेल. आजचा दिवस सर्जनशीलता, संवाद आणि नातेसंबंध मजबूत करण्यासाठी योग्य आहे. या ऊर्जेचा सदुपयोग करा आणि तुमचं जीवन सकारात्मक दिशेने न्या.Lucky Number : 8Lucky Color : Navy Blue
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष संधी आणि नवीन शक्यतांची दारं उघडेल. आज तुम्ही स्वत:च्या भावना अधिक समजून घेण्यास सक्षम असाल. सभोवतालच्या लोकांशी दृढ संबंध निर्माण करता येतील. आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची आणि मनातल्या भावना शेअर करण्याची योग्य वेळ आहे. तुमची संवेदनशील बाजू दिसेल. इतरांच्या भावनांचा आदर करा. महत्त्वाचे निर्णय घेताना विवेकबुद्धीची मदत होईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा. आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. ध्यान आणि योगासनांमुळे मानसिक शांती मिळेल. सामाजिक जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील. मित्र आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल.Lucky Number : 12Lucky Color : Black
advertisement
5/12
सिंह (Leo) : शुक्रवारचा दिवस उत्साहाने आणि सकारात्मकतेने भरलेला असेल. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत असाल तर तो यशस्वी होण्याची शक्यता आहे. ध्येय साध्य करताना घाईघाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबासोबत वेळ घालवणं चांगलं राहील. जवळच्या व्यक्तींशी संवाद साधताना मनातील भावना अधिक उघडपणं व्यक्त करता येतील. नाती दृढ करण्याची गरज आहे. नात्यात दुरावा वाढला असेल तर संवाद साधण्याची योग्य वेळ आली आहे. आज थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आराम करायला विसरू नका. थोडा वेळ योगासनं आणि ध्यान केल्याने मानसिक स्थिती सुधारेल. आज यशाची दारं उघडतील.Lucky Number : 5Lucky Color : Orange
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आज शुक्रवारचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. कष्टाचं आणि समर्पणाचं फळ लवकरच मिळेल. कामात अधिक संघटित आणि फोकस्ड असाल, त्यामुळे चांगले परिणाम मिळतील. आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. व्यायाम आणि योग्य आहार फायदेशीर ठरेल. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान किंवा योगासनं करा. जर तुम्ही एखाद्या विषयावर निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. सर्जनशीलतेमुळे दिवस आणखी विशेष बनेल. विचार उघडपणे व्यक्त केल्याने नवीन संधी मिळतील. सोशल लाइफमध्ये सक्रिय राहून नवीन व्यक्तींशी संपर्क साधल्यास भविष्यात फायदा होईल.Lucky Number : 3Lucky Color : White
advertisement
7/12
तूळ (Libra) : शुक्रवारचा दिवस तुमच्यासाठी समतोल आणि सुसंवादाचं प्रतीक आहे. भावना आणि विचारांमध्ये स्पष्टता जाणवेल. स्वतःला थोडा वेळ दिल्यास आंतरिक संतुलन मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. तुमच्या समोर असलेल्या परिस्थितींचा धीराने सामना करा. आत्मचिंतनासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रवासातून नवीन प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यायाम किंवा योगासनं करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करा. हा दिवस तुम्हाला नवीन संधी देऊ शकतो.Lucky Number : 7Lucky Color : Magenta
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आज शुक्रवारी तुमच्यासाठी नवीन संधींची दारं उघडतील. सर्जनशीलता आणि उत्साहामुळे दीर्घकाळापासून करू इच्छित असलेल्या कामांमध्ये यश मिळेल. स्वत:मधली ऊर्जा ओळखा आणि ती योग्य दिशेने वळवा. नवीन आर्थिक योजना बनवण्याची कल्पना येऊ शकते, त्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यायाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. एखाद्या जुन्या मित्राची भेट झाल्याने नवीन ऊर्जा मिळेल. नवीन अनुभवांचं आत्मविश्वासाने स्वागत करा. आजचा दिवस सकारात्मक बदलांचं आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे.Lucky Number : 1Lucky Color : Sky Blue
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : धनू राशीसाठी शुक्रवारचा दिवस सकारात्मक असेल. उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. ध्येय साध्य करण्यात त्यांची मदत होईल. वैचारिक आणि संवादाच्या क्षेत्रात घडामोडी वाढतील. त्यामुळे महत्त्वपूर्ण संभाषण आणि बैठकांसाठी ही वेळ चांगली आहे. सहकारी आणि मित्रांचं सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. घाई न करता योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करा. योगासनं आणि ध्यान करण्याचा संकल्प करा. यामुळे शारीरिक आणि मानसिक लाभ मिळेल. वेळेचा सदुपयोग करा आणि ध्येयाकडे वाटचाल करत राहा. उत्साह आणि सकारात्मक विचारांमुळे यश मिळेल.Lucky Number : 5Lucky Color : Green
advertisement
10/12
मकर (Capricorn) : मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रवारचा दिवस सकारात्मकता आणि संधींनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचं आणि प्रयत्नांचं कौतुक होईल. तुम्हाला पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबात शांती आणि आनंद असेल. प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवता येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. खर्चाकडे लक्ष देण्याची आणि बचतीचं नियोजन करण्याची हीच योग्य वेळ आहे. वैयक्तिक नातेसंबंधही घट्ट होतील. पुरेशी विश्रांती घ्या आणि फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी सुरू ठेवा. आव्हानांवर मात करण्यासाठी आणि नवीन मार्ग शोधण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. सकारात्मक विचार करा.Lucky Number : 6Lucky Color : Brown
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला असेल. कल्पना आणि सर्जनशीलता उदयास येईल. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना आणि दृष्टिकोन एक्सप्लोअर केल्याने महत्त्वपूर्ण यश मिळू शकतं. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन आनंदी होईल. आज एखाद्या विशिष्ट विषयावर आपले विचार स्पष्टपणं मांडण्याचा प्रयत्न करा. इतरांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ऊर्जा पातळी उच्च असेल आणि यामुळे जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी मिळेल. आरोग्याबाबत जागरूक राहिल्याने आज तुम्हाला ताजेतवाने वाटेल. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. ध्यान आणि योगासनं फायदेशीर ठरू शकतात.Lucky Number : 10Lucky Color : Pink
advertisement
12/12
मीन (Pisces) : आज तुम्ही लोकांच्या भावना समजून घेऊ शकाल. जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नातेसंबंध आणखी गोड होतील. कल्पनाशक्ती आज उच्च पातळीवर असेल. तुमच्याकडे नवीन प्रकल्प किंवा सर्जनशील कल्पना असल्यास त्याची चाचणी घ्या. ध्यान आणि साधनेतून मानसिक शांती मिळेल. स्वतःसाठी थोडा वेळ देण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या. योगासनं किंवा ध्यान केल्याने मन शांत होऊ शकते. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस सामान्य असेल. खर्चावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचे ठरेल. आजचा दिवस सुंदर आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असेल. अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवा.Lucky Number : 11Lucky Color : Blue
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: भयंकर अडचणींमधून मार्ग काढले! या 5 राशींचे आता चमकणार नशीब; कष्टाला बुध-गुरुची साथ