Weekly Rashi Bhavishya In Marathi: गजकेसरीसह अनेक शुभ योग! या राशींचे चमकणार भाग्य, पहा साप्ताहिक राशीभविष्य
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag
Last Updated:
Weekly Rashi Bhavishya In Marathi: येणारा आठवडा कसा असेल, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा साप्ताहिक राशिभविष्य (12 ते 18 फेब्रुवारी 2024)
advertisement
1/12

मेष (Aries) : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या बोलण्या-वागण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवावं लागेल. असं न केल्यास तुमची कामं विस्कळीत होऊ शकतात. नशिबाची साथ मिळेल; पण मेहनत आणि प्रयत्नांचा फायदा मिळण्यासाठी हा सल्ला लक्षात ठेवा. आठवड्याच्या पूर्वार्धात व्यवसायासंदर्भात जवळ किंवा लांबचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास सुखकर होईल आणि नवीन संपर्क वाढेल. तुम्हाला कुटुंबीयांकडून घरासह प्रत्येक बाबतीत पाठिंबा मिळेल. त्यांच्या मदतीने नियोजित कामं वेळेत पूर्ण कराल. आठवड्याचा उत्तरार्ध व्यावसायिक दृष्टिकोनातून शुभ आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो; पण सुखसोयी आणि चैनीच्या गोष्टींवर जास्त खर्च होईल. तुम्ही जोडीदाराच्या शोधात असाल तर एखादी नवीन व्यक्ती जीवनात प्रवेश करू शकते. आधीच असलेले प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Brown Lucky Number : 5
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : कोणत्याही कामात उतावळेपणा किंवा निष्काळजीपणा टाळा अन्यथा मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. भागीदारात व्यवसाय करत असाल तर हिशोब चुकता करून पुढे जा. इतर व्यक्तींवर आंधळेपणानं विश्वास ठेवणं टाळा. नोकरदार व्यक्तींनी ऑफिसमध्ये कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीपासून सावध राहावं. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला छोट्या कामासाठीदेखील धावपळ करावी लागू शकते. घरातले नातेवाईक आणि बाहेरच्या व्यक्तींकडून पुरेसं सहकार्य न मिळाल्याने तुम्हाला दुःख वाटेल; पण ही स्थिती आठवड्याच्या उत्तरार्धात बदलेल आणि अनुकूलता वाढू लागेल, विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकतं. प्रेमसंबंध असोत अथवा कौटुंबिक संबंध, रागाच्या किंवा भावनेच्या भरात मोठा निर्णय घेणं टाळा. अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. सुखी वैवाहिक जीवनासाठी व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ जोडीदारासाठी काढा. दिनचर्येसोबत योग्य आहार घ्या आणि बदलत्या हवामानामुळे होणारे आजार टाळा.Lucky Color : Golden Lucky Number : 1
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : आठवड्याचा पूर्वार्ध संमिश्र असेल. एखादा प्रकल्प किंवा योजना पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला त्यासाठी आणखी काही वेळ वाट पाहावी लागू शकते. ऑफिसमध्ये अचानक कामाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जवळच्या मित्रांकडून सहकार्य मिळेल. पूर्वार्धाच्या तुलनेत आठवड्याचा उत्तरार्ध शुभ आणि लाभदायक असेल. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना ऑफिसमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल. बढती किंवा बदलीची इच्छा पूर्ण होईल. प्रेमसंबंधात विचारपूर्वक पुढे जा. भावनेच्या भरात कोणतंही पाऊल उचलणं टाळा. अन्यथा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. सुखी वैवाहिक जीवनासाठी जोडीदारावर विनाकारण रागावणं टाळा. त्याच्या किंवा तिच्या भावनांचा आदर करा. चुकूनही मतभेद होऊ देऊ नका.Lucky Color : Maroon Lucky Number : 7
advertisement
4/12
कर्क (Cancer) : कोणत्याही कामात निष्काळजीपणा टाळा. अन्यथा पूर्ण होत आलेलं काम बिघडू शकतं. नियोजित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागतील. आठवड्याच्या सुरुवातीला अचानक मोठा खर्च उद्भवेल. त्यामुळे तुमचं बजेट कोलमडू शकतं. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच्या लहानसहान गोष्टींना महत्त्व देणं टाळून एकत्र येऊन काम करा. नोकरदार महिलांना काम आणि घराचा समतोल ठेवण्यात अडचणी येऊ शकतात. व्यावसायिकांना मोठ्या चढ-उताराला सामोरं जावं लागेल. प्रतिस्पर्धी तुमच्यासमोर कठीण आव्हान उभं करतील. आठवड्याच्या उत्तरार्धात करिअर किंवा व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो. जमीन किंवा घर विकत घेण्याचा किंवा विकण्याचा विचार करत असाल तर निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रेमसंबंध सामान्य असतील. जीवनातल्या कठीण प्रसंगी जोडीदार आधार देईल. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावू शकते.Lucky Color : Violet Lucky Number : 10
advertisement
5/12
सिंह (Leo) : पैशांचा काळजीपूर्वक विचार करा. अन्यथा नंतर आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं. आठवड्याच्या सुरुवातीला जवळच्या पैशांतून चैनीच्या वस्तू खरेदी कराल किंवा घराची दुरुस्ती कराल. तुमचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सहभाग वाढेल. राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना आठवड्याच्या शेवटी एखादं मोठं पद किंवा जबाबदारी मिळू शकते. सत्ता किंवा प्रशासनाशी संबंधित कामात अपेक्षित यश मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक लांब किंवा जवळचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास लाभदायक आणि सुखकर ठरेल. प्रवासादरम्यान नवीन व्यक्ती संपर्कात येतील. या व्यक्तींमुळे भविष्यात फायदेशीर योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबातल्या सदस्यांशी एखाद्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. त्या वेळी छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं टाळा. प्रेमसंबंधात गोडवा टिकून ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावानांकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य सामान्य राहील.Lucky Color : Silver Lucky Number : 15
advertisement
6/12
कन्या (Virgo) : या आठवड्यात नातेसंबंध, आरोग्य आणि आवश्यक वस्तूंची विशेष काळजी घ्यावी लागेल. याकडे दुर्लक्ष केल्यास समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. नातेवाईकांशी कोणत्याही मुद्द्यावर मतभेद झाले तर वाद न वाढवता सामंजस्यानं मतभेद दूर करा. आठवड्याच्या सुरुवातीला कौटुंबिक वादामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील. व्यावसायिकांनी पैशांचे व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. कोणत्याही जोखमीच्या योजना किंवा गोष्टीत पैसे गुंतवू नयेत. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा अन्यथा शारीरिक इजा होऊ शकते. आहार आणि दिनचर्येकडे लक्ष द्या. याकडे दुर्लक्ष झालं तर रुग्णालयात जावं लागेल. तुम्हाला तुमच्या आईचीदेखील काळजी घ्यावी लागेल. इतरांच्या चुकीमुळे तुमच्या प्रेमसंबंधात दुरावा येऊ देऊ नका. कोणतेही गैरसमज संवादातून दूर करा. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Red Lucky Number : 6
advertisement
7/12
तूळ (Libra) : घर, कुटुंब किंवा कामाच्या बाबतीत एखादी चिंता सतावेल. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त होत असल्याने चिंतेत राहाल. आठवड्याच्या सुरुवातीला नोकरदार व्यक्तींना एखादं काम कमी वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान पेलावं लागू शकतं. उपलब्ध गोष्टींच्या मदतीनं अमर्याद उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत आणि कठोर परिश्रम करावे लागतील. या वेळी अहंकार दूर ठेवून ज्या व्यक्तींना तुम्ही फारसे आवडत नाही अशा व्यक्तींची मदत घ्यावी लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात घाईत किंवा गोंधळलेल्या मानसिकतेत मोठे निर्णय घेणं टाळा. अन्यथा नंतर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर निर्णय घेण्यापूर्वी हितचिंतकाचा सल्ला घ्या. प्रेमसंबंधात अडचणी वाढू शकतात. जोडीदाराशी वेळेवर संपर्क न झाल्याने तुमचं मन अस्वस्थ राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहण्यासाठी मतभेदाचं रूपांतर वादात होऊ देऊ नका.Lucky Color : Blue Lucky Number : 12
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आठवड्यात नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवा. जितकी जास्त मेहनत कराल तितकं चांगलं यश मिळेल. जीवनात कोणत्याही गोष्टीसाठी शॉर्टकट टाळा. जोखमीच्या योजना किंवा शेअर बाजारात पैसे गुंतवणं टाळा. अन्यथा आर्थिक नुकसान होईल. आठवड्याच्या मध्यात कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतात. त्यामुळे थोडं दुःख वाटेल; पण आठवड्याच्या अखेरीस घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीमुळे गैरसमज दूर होतील. आठवड्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध शुभ आणि भाग्यवर्धक असेल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यावसायिक बाजारातल्या तेजीचा फायदा मिळवण्यात यशस्वी होतील. प्रिय सदस्याच्या आगमनामुळे घरात आनंदी वातावरण राहील. वाद असले तरी प्रिय जोडीदाराशी तुमचे संबंध मधुर राहतील. वैवाहिक जीवन आनंदी असेल.Lucky Color : Green Lucky Number : 9
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : तुमच्यासाठी आठवडा शुभ आहे. कामाच्या व्यग्र वेळपत्रकात तुम्हाला तुमचं आरोग्य आणि जवळच्या नातेवाईकांसाठी थोडा वेळ काढावा लागेल. अन्यथा या दोन्ही गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. हंगामी किंवा जुनाट आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा त्याचा परिणाम शरीरावर तसंच कामावर होऊ शकतो. न्यायालयात जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल तर आणखी लांबवण्यापेक्षा वाटघाटीद्वारे संपवण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक दृष्टिकोनातून आठवडा शुभ आहे. आठवड्याच्या शेवटी व्यवसायाशी संबंधित एखादा सौदा कराल. बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल. अपेक्षित नफा मिळेल. मुलांशी संबंधित एखादी मोठी चिंता दूर झाल्याने सुटकेचा निःश्वास सोडाल. प्रेम संबंध दृढ होतील. प्रिय जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदारासोबत लांब किंवा जवळचा प्रवास कराल.Lucky Color : Grey Lucky Number : 11
advertisement
10/12
मकर (Capricorn) : कामात यश मिळवण्यासाठी पूर्ण समर्पणाने आणि वेळेवर काम करावं लागेल. कामात निष्काळजीपणा दाखवला किंवा महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं तर त्रास सहन करावा लागू शकतो. नोकरदार व्यक्तींनी ऑफिसमध्ये चूक करणं टाळावं अन्यथा वरिष्ठांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. आठवड्याच्या मध्यात करिअर किंवा व्यवसायासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवासादरम्यान आरोग्याची आणि सामानाची काळजी घ्या. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा. आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक मोठा खर्च उद्भवू शकतो. त्यामुळे तुमचं बजेट विस्कळीत होईल. नोकरदार महिलांसाठी हा कालावधी काहीसा अडचणीचा असेल. घर आणि ऑफिसमध्ये समन्वय राखण्यात अडचणी येतील. प्रेमसंबंध चांगले राहण्यासाठी जोडीदाराच्या भावानांकडे दुर्लक्ष करू नका. सुखी वैवाहिक जीवनासाठी तुमच्या जोडीदारासोबत एकनिष्ठ राहा.Lucky Color : Yellow Lucky Number : 3
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : तुमच्यासाठी आठवडा संमिश्र असेल. आठवड्याच्या सुरुवातीला विरोधाभास असलेल्या स्थितीचा सामना करावा लागेल. या काळात वडिलोपार्जित संपत्ती, जमीन किंवा घराशी संबंधित वाद सोडवण्यासाठी न्यायालयात फेऱ्या माराव्या लागतील. नोकरदार व्यक्तींना कामाचा ताण जाणवेल. विरोधक सक्रिय राहतील. या सर्व कठीण परिस्थितीत जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडून मिळत असलेला पाठिंबा तुम्हाला बळ आणि ऊर्जा देईल. आठवड्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध चांगला असेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीमुळे प्रलंबित कामं पूर्ण होतील. आर्थिक बाजू, नोकरी, व्यवसाय बळकट होतील. नोकरदार व्यक्तींना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत मिळेल. व्यवसायात थोडा फायदा होईल. परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम केले तरच यश मिळेल. प्रेमसंबंध सामान्य राहतील. वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी जोडीदाराला थोडा वेळ द्या.Lucky Color : Pink Lucky Number : 4
advertisement
12/12
मीन (Pisces) : तुम्हाला आळस आणि गर्व टाळावा लागेल. कामात अपेक्षित यश मिळवण्यासाठी स्वप्न बघण्याऐवजी मेहनतीवर भर द्या. करिअर किंवा व्यवसायात निष्काळजीपणामुळे काम बिघडू शकतं. हातातला प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करा. प्रसंगी वयानं लहान असलेल्या व्यक्तींची याकरिता मदत घ्या. आठवड्याच्या मध्यात, नियोजित योजनांमध्ये प्रगती होईल; पण अचानक अडथळा आल्याने समस्या वाढतील. यावर मात करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागतील. महिला वर्गाला धार्मिक कार्यात रस वाटेल. प्रेमसंबंधात घाई केल्यास अडचणी वाढतील. अशा परिस्थितीत विचारपूर्वक वाटचाल करा. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Black Lucky Number : 8
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Rashi Bhavishya In Marathi: गजकेसरीसह अनेक शुभ योग! या राशींचे चमकणार भाग्य, पहा साप्ताहिक राशीभविष्य