TRENDING:

BYD: नाश्ता संपेपर्यंत car होते फुल चार्ज, 650 किमी रेंज; Tesla ला सुद्धा फुटला घाम!

Last Updated:
टेस्लाचा कट्टर दुश्मन म्हणून ओळखली जाणारी चायनीज कंपनी BYD ने भारतात एंट्री मारली आहे. BYD ने अलीकडेच भारतात...
advertisement
1/7
नाश्ता संपेपर्यंत car होते फुल चार्ज, 650 किमी रेंज; Tesla ला सुद्धा फुटला घाम!
----------- भारतात आता ईलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड सुरू झाला आहे. हेच लक्षात घेऊन टेस्ला सारखी कंपनी भारतात पाऊल ठेवत आहे. पण टेस्लाचा कट्टर दुश्मन म्हणून ओळखली जाणारी चायनीज कंपनी BYD ने भारतात एंट्री मारली आहे. BYD ने अलीकडेच भारतात इलेक्ट्रिक सेडान BYD Seal लाँच केली आहे. या कारचे फिचर्स हे टेस्लाला टक्कर देण्यासारखे आहे. BYD सील इलेक्ट्रिक सेडान ही Dynamic RWD, Premium RWD आणि Performance AWD व्हेरिएंटमध्ये लाँच झाली आहे.
advertisement
2/7
BYD ने आपल्या कारमध्ये लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी दिली आहे, ज्याची १५ वर्षांची लाइफटाइम आहे. ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ५१० किमी ते ६५० किमी पर्यंतची रेंज देते, हे व्हेरिएंटवर अवलंबून आहे.
advertisement
3/7
ही कार डीसी फास्ट चार्जर वापरून, बॅटरी फक्त १५ मिनिटांत २०० किमी चार्ज करता येते, तर ८०% चार्ज होण्यास फक्त ४५ मिनिटे लागतात.
advertisement
4/7
फिचर्स पाहिले तर, प्रीमियम आणि आधुनिक डिझाइन, १५.६-इंच फिरणारी टचस्क्रीन, १०.२५-इंच फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, क्रिस्टल गियरशिफ्ट, वायरलेस चार्जिंग आणि हेड-अप डिस्प्ले दिले आहे.
advertisement
5/7
या कारला सेफ्टीमध्ये युरोप क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. तसंच या कारमध्ये वायरलेस अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट, अपग्रेडेड एअर कंडिशनिंग सिस्टम, साउंड वेव्ह फंक्शन आणि पूर्ण सस्पेंशन अपग्रेड दिले आहे.
advertisement
6/7
या कारची लांबी ४,८०० मिमी, रुंदी १,८७५ मिमी आणि उंची १,४६० मिमी आहे. तर या कारचा व्हीलबेस २,९२० मिमी आहे जो आत पायांसाठी पुरेशी जागा देतो. ग्राउंड क्लिअरन्स १४५ मिमी इतका आहे. बॅग ठेवण्यासाठी बूट स्पेस- कारमध्ये ४०० लिटरची बूट स्पेस आहे.
advertisement
7/7
या डायनॅमिक RWD ची किंमत ४१ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर प्रीमियम RWD ची किंमत ४५.७० लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. Performance AW ५३.१५ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. ही कार तिच्या सेगमेंटमध्ये Hyundai Ioniq 5, Kia EV6, Volvo XC40 Recharge आणि BMW i4 सारख्या कारशी स्पर्धा करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
BYD: नाश्ता संपेपर्यंत car होते फुल चार्ज, 650 किमी रेंज; Tesla ला सुद्धा फुटला घाम!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल