Traffic Police : 'या' गोष्टी पाहून पोलीस थांबवतात गाडी, लगेच समजून घ्या ट्राफिक नियम
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पोलिस किंवा वाहतूक अधिकारी लगेच वाहन थांबवून दंड करू शकतात. पण अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यासाठी पोलीस गाडी थांबवतात.
advertisement
1/7

बर्‍याच वेळा वाहन चालवताना चालकांकडून काही साध्या पण गंभीर चुका होतात. या चुका केवळ वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन नसतात, तर सुरक्षेलाही धोका निर्माण करतात. अशा वेळी पोलिस किंवा वाहतूक अधिकारी लगेच वाहन थांबवून दंड करू शकतात. पण अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यासाठी पोलीस गाडी थांबवतात.
advertisement
2/7
ड्रायव्हिंग लायसन्स (DL) आणि नोंदणी प्रमाणपत्र (RC) वाहन चालवताना हे कागदपत्र नेहमी सोबत असणे आवश्यक आहे. त्यांची वैधता संपलेली असल्यास दंड होऊ शकतो. इन्शुरन्स पॉलिसी आणि PUC प्रमाणपत्र वैध थर्ड पार्टी इन्शुरन्स आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) असणे कायद्याने बंधनकारक आहे. हे नसल्यास वाहन थांबवले जाऊ शकते.
advertisement
3/7
सीट बेल्ट / हेल्मेट न लावणेचारचाकी वाहनात सीट बेल्ट लावणे आणि दुचाकीवर चालक तसेच मागील प्रवाशाने हेल्मेट (काही शहरात हे गरजेचं आहे) घालणे आवश्यक आहे.
advertisement
4/7
ओव्हरलोडिंग (Overloading)कारमध्ये क्षमता पेक्षा जास्त प्रवासी नेणे किंवा दुचाकीवर दोनपेक्षा अधिक व्यक्ती बसवणे नियमबाह्य आहे.दारू पिऊन वाहन चालवणे (Drink & Drive)नशेत गाडी चालवणे ही गंभीर गुन्हा मानला जातो.
advertisement
5/7
नंबर प्लेट खराब किंवा तुटलेली असणेनंबर प्लेटवरील अक्षरं स्पष्ट दिसली पाहिजेत. ती तुटलेली किंवा मिटलेली असल्यास कारवाई होऊ शकते.फॅन्सी नंबर प्लेट, स्टीकर किंवा कोणतंही डिझाइन असलेली नंबर प्लेट कायद्याच्या विरोधात आहे.काळी काचसर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार ठराविक टक्केवारीपेक्षा अधिक गडद काच वापरण्यास मनाई आहे.अतिआवाजाचा हॉर्न किंवा सायलेंसर, तसेच प्रदूषण वाढवणारे सायलेंसर वापरणे गुन्हा आहे.अयोग्य हेडलाइट्स, अतिचमकदार, निळ्या किंवा रंगीत लाइट्स वापरणे टाळा. यामुळे समोरच्या वाहनचालकाला त्रास होतो.
advertisement
6/7
वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणे (Over Speeding) हे अपघाताचे प्रमुख कारण आहे. असं केलं असेल तरी पोलीस गाडी थांबवतात. सिग्नल तोडल्यास देखील दंड आकारला जातो.वाहन चालवताना फोनवर बोलणे, मेसेज टाईप करणे अत्यंत धोकादायक आहे. असं करताना कोणी दिसलं तरी देखील कारवाई होऊ शकते.धोकादायक ओव्हरटेक (Risky Overtaking) चुकीच्या बाजूने किंवा अचानक ओव्हरटेक करणे अपघातास कारणीभूत ठरू शकते.
advertisement
7/7
वाहन चालवताना हे नियम पाळणे केवळ दंड टाळण्यासाठी नाही, तर तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे. रस्त्यावर संयम ठेवा आणि जबाबदार नागरिक म्हणून वाहन चालवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Traffic Police : 'या' गोष्टी पाहून पोलीस थांबवतात गाडी, लगेच समजून घ्या ट्राफिक नियम