HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करणाऱ्यांनो लक्ष द्या! आधी ही माहिती वाचा, वाचतील पैसे
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
high security number plate : राज्यातील जवळपास सर्व वाहनांना आता हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावणं हे अनिवार्य करण्यात आलं आहे. यामुळे वाहन धारक नंबर प्लेट लावण्यासाठी घाई करत आहेत.
advertisement
1/8

महाराष्ट्र सरकारने राज्यामधील सर्वच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट असावी असं म्हटलंय. एसएसआरपी नंबर प्लेट लावणं अनिवार्य असल्यामुळे वाहनधारकांना ही नंबर प्लेट लावणं गरजेचं आहे.
advertisement
2/8
सरकारने नुकतीच एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत वाढवली आहे. येत्या 30 जूनपर्यंत तुम्ही तुमच्या वाहनांना हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावून घेऊ शकता. मात्र ही नंबर प्लेट लावताना केलेली एक चूक तुम्हाला कंगाल करु शकते.
advertisement
3/8
हाय सिक्योरिटी रजिस्टर्ड प्लेट बसवणे बंधनकारक आहे. यामुळे वाहनधारक हे या प्लेटची ऑनलाइन नोंदणी करत आहेत. मात्र हे करताना खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.
advertisement
4/8
सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेसचाच फायदा घेत बनावट वेबसाइट तयार करुन वाहनधारकांना गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे एचएसआरपी नोंदणी करत असताना खूप सावध राहणं गरजेचं आहे.
advertisement
5/8
राज्य सरकारने वाहनधारकांसाठी transport.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाइट एसएसआरपी नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. मात्र सायबर गुन्हेगारांनी अशीच दिसणारी एक वेबसाइट तयार करत जाळं रचलं आहे.
advertisement
6/8
आतापर्यंत देशभरात अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या. ज्यामध्ये एसएसआरपी नंबर प्लेटसाठी अर्ज करताना बनावट वेबसाइटच्या जाळ्यात वाहनधारक फसले आहेत. ज्यामुळे त्यांनी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. पण तुम्ही असं करु नका. योग्य वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केल्याने तुमचे पैसे वाचू शकतात. तुमची फसवणूक तुम्हीच टाळू शकता.
advertisement
7/8
एवढंच नाही तर अनेक ठिकाणी फेसबुक, व्हॉट्सअॅप इंस्टाग्रामवर विविध लिंक टाकल्या जातात. ज्यामध्ये लिंकवर रजिस्ट्रेशन करुन घरबसल्या मिळवा एचएसआरपी नंबर प्लेट असंही लिहिलं जातं. मात्र तुम्ही अशा कोणत्याही जाहिरातीला बळी पडू नका.
advertisement
8/8
याविरोधात सरकार पावलंही उचलत आहे. मात्र तरीही आपण सजग राहणं महत्त्वाचं आहे. यामुळेच एसएसआरपीची नोंदणी करताना महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाइट https://transport.maharashtra.gov.in येथेच नोंदणी करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करणाऱ्यांनो लक्ष द्या! आधी ही माहिती वाचा, वाचतील पैसे