Guess Who: फ्लॉपवर फ्लॉप देतोय स्टारकिड, एका हिटसाठी तरसला; कोण आहे तो?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Guess Who: बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्सना मोठ्या पडद्यावर पदार्पण मिळते पण यातील काहीच आपलं वर्चस्व या इंडस्ट्रीवर बनवतात. यातील काही हिट होतात तर काहींवर फ्लॉपचा शिक्का लागतो.
advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्सना मोठ्या पडद्यावर पदार्पण मिळते पण यातील काहीच आपलं वर्चस्व या इंडस्ट्रीवर बनवतात. यातील काही हिट होतात तर काहींवर फ्लॉपचा शिक्का लागतो. असाच एक स्टारकिड जो बॅक टू बॅक फ्लॉप देतोय.
advertisement
2/7
2014 मध्ये या स्टारकिडने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण त्याचं करिअर म्हणावं असं हिट गेलं नाही. स्टारकिड असूनही त्याला हिट देण्यासाठी प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.
advertisement
3/7
आपण बोलत असलेला हा स्टारकिड दुसरा तिसरा कोणी नसून टायगर श्रॉफ आहे. ‘हिरोपंती’मधून त्याने पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि टायगरची अभिनय आणि स्टंट कौशल्याची ओळख झाली.
advertisement
4/7
यानंतर त्याने 'बागी' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. श्रद्धा कपूरसोबतची जोडी हिट ठरली, आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कामगिरी केली. पण त्यानंतर येणारे काही चित्रपट अपेक्षेप्रमाणे यश मिळवू शकले नाहीत.
advertisement
5/7
2016 मध्ये प्रदर्शित 'अ फ्लाइंग जट' आणि 2017 मध्ये आलेला 'मुन्ना मायकल' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. टायगरला पहिल्या मोठ्या हिटचा अनुभव 'बागी 2' मध्ये आला. या चित्रपटाने देशांतर्गत 166 कोटी आणि जगभरात 257 कोटी रुपयांची कमाई केली.
advertisement
6/7
त्यानंतर 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' फ्लॉप ठरला, पण 'वॉर' मध्ये हृतिक रोशनसोबत काम करून टायगरला सहाय्यक भूमिकेत देखील म्हणावं असं यश मिळालं नाही.
advertisement
7/7
टायगर श्रॉफसाठी आता हा काळ नवीन संधी शोधण्याचा आणि चित्रपटांच्या निवडीवर अधिक लक्ष देण्याचा आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि बॉक्स ऑफिसचा परिणाम त्याच्या पुढील करिअरवर मोठा प्रभाव टाकणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: फ्लॉपवर फ्लॉप देतोय स्टारकिड, एका हिटसाठी तरसला; कोण आहे तो?