TRENDING:

Honda ने केली कमाल, मार्केटमध्ये आणली जबरदस्त BIKE, लूक पाहून पडाल प्रेमात

Last Updated:
जपानी कंपनी होंडा मोटर्स नेहमी आधुनिक आणि दमदार अशी वाहनं उत्पादनात अग्रेसर आहे. अशातच होंडा मोटर्सने एक आगळीवेळी अशी बाइक honda  E-VO लाँच केली आहे.
advertisement
1/8
Honda ने केली कमाल, मार्केटमध्ये आणली जबरदस्त BIKE, लूक पाहून पडाल प्रेमात
इंधनाचे वाढते दर आणि प्रदुषणामुळे सगळ्याच कार आणि दुचाकी उत्पादक कंपन्या ईलेक्ट्रिक वाहनं तयार करण्यावर भर देत आहे. जपानी कंपनी होंडा मोटर्स नेहमी आधुनिक आणि दमदार अशी वाहनं उत्पादनात अग्रेसर आहे. अशातच होंडा मोटर्सने एक आगळीवेळी अशी बाइक honda  E-VO लाँच केली आहे. या बाइकचा लूक  रेट्रो कॅफे रेसर स्टाइलिंग आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि कामगिरीचं दमदार असं मिश्रण आहे.
advertisement
2/8
होंडा मोटर्सने आपली ही E-VO सध्या चीनच्या मार्केटमध्ये लाँच केली आहे. होंडा E-VO मध्ये दोन बॅटरी कॉन्फिगरेशन आहे.  ४.१ किलोवॅट तासाचा ड्युअल-बॅटरी प्रकार आणि ६.२ किलोवॅट तासाचा ट्रिपल-बॅटरी प्रकार. लहान बॅटरी पॅक १२० किमीची रेंज आणि १४३ किलोग्रॅम वजन आहे, असा दावा केला जातो, तर मोठ्या बॅटरीची १५६ किलोग्रॅम वजनाची असून रेंज १७० किमी आहे.
advertisement
3/8
दोन्ही मॉडेल्समध्ये १५.८ किलोवॅट (२१ एचपी) इलेक्ट्रिक मोटर आहे, ज्यामुळे बाइक १२० किमी प्रतितास या कमाल वेगापर्यंत पोहोचू शकते. चार्जिंगचा वेळ देखील चांगला आहे. लहान बॅटरी पॅक चार्ज होण्यासाठी फक्त १-१.५ तास लागतो. तर मोठी बॅटरी चार्जरिंगसाठी १.५ ते २.५ तास घेते.
advertisement
4/8
ही बाइक फोर्ज्ड ऑल-अ‍ॅल्युमिनियम फ्रेमवर बनवलेली आहे. E-VO हलकी आणि मजबूत बनवली आहे. यात १६-इंच फ्रंट आणि १४-इंच रियर व्हील सेटअप आहे, अतिरिक्त ग्रिपसाठी सेमी-स्लिप टायर्स आहे. ड्युअल-चॅनेल ABS मानक आहे आणि ७६५ मिमी सीटची उंची ही बाईक विविध प्रकारच्या रायडर्ससाठी बेस्ट आहे. E-VO  ही  फिचर्समध्येही वेगळी आहे.
advertisement
5/8
ही जगातील पहिल्या इलेक्ट्रिक बाइक एक आहे ज्यामध्ये इंटीग्रेटेड डॅशकॅम आहेत. ४.१kWh व्हेरिएंटमध्ये फ्रंट डॅशकॅम आहे, तर ६.२kWh मॉडेलमध्ये मागील डॅशकॅम देखील आहे. बाईकला ड्युअल ७-इंचाचे TFT डिस्प्ले मिळतो.
advertisement
6/8
एक मुख्य इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी आणि दुसरा नेव्हिगेशन, टायर प्रेशर मॉनिटरिंग (TPMS) आणि बॅटरी स्थितीसाठी आहे. रायडर्स 3 रायडिंग मोडमधून निवडू शकतो, यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट, जे बाईकच्या रीजनरेटिव्ह ब्रेकिंग वर्तनावर देखील परिणाम करतात.
advertisement
7/8
किंमत -  होंडाने ई-व्हीओची किंमत ४.१ किलोवॅट क्षमतेच्या व्हेरिएंटसाठी ३०,००० चिनी युआन (सुमारे ३.५६ लाख रुपये) आणि ६.२ किलोवॅट क्षमतेच्या व्हेरिएंटसाठी ३७,००० चिनी युआन (सुमारे ४.३८ लाख रुपये) ठेवली आहे. त्याच्या प्रीमियम फिचर्स आहे.
advertisement
8/8
ई-व्हीओ लवकरच भारतात लाँच होणार नाही. होंडा सध्या भारतात एक मोठा ईव्ही प्लांट उभारत आहे, जो २०२८ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर भारतीय गरजांनुसार विशेषतः तयार केलेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकली लाँच करू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Honda ने केली कमाल, मार्केटमध्ये आणली जबरदस्त BIKE, लूक पाहून पडाल प्रेमात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल