TRENDING:

Jawa करणार आता रॉयल एनफिल्डचं मार्केट जाम, आणतेय दमदार बाइक, लूक एक नंबर!

Last Updated:
आता पुन्हा एकदा क्लासिक लिजेंड्स आपली लोकप्रिया  येजदी अडव्हेंचर (Yezdi Adventure) चं नवीन अपडेटेट व्हर्जन लाँच करणार आहे.
advertisement
1/5
Jawa करणार आता रॉयल एनफिल्डचं मार्केट जाम, आणतेय दमदार बाइक, लूक एक नंबर!
नवदच्या दशकामध्ये भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये आपला दबदबा निर्माण करणारी जावा Jawa कंपनीच्या दुचाकींना कुणीही विसरू शकत नाही. आता Jawa ने नव्या रुपात आणि नव्या ढगामध्ये Jawa नव्याने मार्केटमध्ये लाँच केली. आता पुन्हा एकदा क्लासिक लिजेंड्स आपली लोकप्रिया  येजदी अडव्हेंचर (Yezdi Adventure) चं नवीन अपडेटेट व्हर्जन लाँच करणार आहे.  ही बाइक ऑफ रोड वाहनं प्रेमी ग्राहकांना समोर ठेवून लाँच केली जात आहे. 
advertisement
2/5
कंपनीने मागील वर्षभरात Yezdi Adventure मध्ये अनेक छोटेमोठे बदल केले. या बाइकमध्ये आता अपग्रेड इंजिन येणार आहे. तसंच डिझाइनमध्ये ही बदल केले जाणार आहे. खास करून फ्यूल टँकच्या जवळ असलेल्या मेटल क्रॅश केज जोडण्यात येणार आहे. त्यामुळे बाइक आणखी मजबूत होईल.  
advertisement
3/5
 Yezdi Adventure च्या नवीन मॉडेलचं डिझाइनमध्ये अनेक बदल केले जाणार आहे. या बाइकचा लूक बदलला जाईल, ज्यामुळे या सेगमेंटमध्ये ही बाइक वेगळी ओळखली जाईल. तसंच बाइकमध्ये पॉवरफुल इंजिन दिलं जाणार आहे. यामध्ये 334cc चं लिक्विड-कूल्ड इंजिन असेल जे 29.6 हॉर्सपावर आणि 29.8Nm टॉर्क जनरेट करेल. पण या बाइकचा परफॉर्मेंस हा आधीच्या बाइक सारखाच असेल.  
advertisement
4/5
 Yezdi Adventure ची किंमत ही कलर ऑप्शन नुसार कमी जास्त असेल.  2.10 लाख रुपयांपासून या बाइकची किंमत सुरू होते. 2.16 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमत असेल.
advertisement
5/5
ही किंमत Hero Xpulse 210, KTM 250 Adventure आणि Royal Enfield Himalayan 450 च्या बाइकच्या आसपास आहे. आता नव्या  Yezdi Adventure ची मुळ किंमत किती असेल हे १५ मे रोजी स्पष्ट होईल.  ही बाइक तुम्हाला Flipkart वर सुद्धा विकत घेता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Jawa करणार आता रॉयल एनफिल्डचं मार्केट जाम, आणतेय दमदार बाइक, लूक एक नंबर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल