Maruti खरंच लीजेंड Omni परत लाँच करतेय? ते फोटो का होताय व्हायरल?
- Published by:sachin Salve
Last Updated:
. ९० च्या काळात अशीच एक कार होती तिला कुणीच विसरू शकत नाही. ही कार होती मारुती ओमनी....
advertisement
1/8

भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादन कंपनी मारुतीने आजपर्यंत अनेक अशा कार बाजारात आणल्यात ज्यांनी भारतीयांच्या मनात कायम घरं केलं. मारुती ८०० असेल किंवा अल्टो असेल, मारुतीने प्रत्येक भारतीयांची कारचे मालक होण्याचे स्वप्न पूर्ण केलं. ९० च्या काळात अशीच एक कार होती तिला कुणीच विसरू शकत नाही. ही कार होती मारुती ओमनी....
advertisement
2/8
तो काळ मारुतीचा होता. मारूती सुझुकीने मारूती 800 लाँच केल्यानंतर एक वर्षाने म्हणजे 1984 मध्ये भारतात ग्राहकांसाठी ओम्नी लाँच केली होती. मारूतीच्या या कारने 35 वर्षं बाजारात आपलं अस्तित्त्व टिकवून ठेवलं.
advertisement
3/8
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मारुती सुझुकी ओमनी परत एकदा लाँच केली जाणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर मारुती ओमनीचे काही फोटो सुद्धा समोर आले. पण याची खातरजमा केली असता मारुतीने अद्याप ओमनीला परत लाँच करण्याबद्दल असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो हे AI जनरेट असल्याचं निष्पन्न झालं.
advertisement
4/8
मारूतीने ओमनी का बंद केली 2019 मध्ये वाहनांच्या सुरक्षेविषयी केंद्र सरकारने काही नवीन नियम लागू केले होते. हे नियम सुरक्षेच्या दृष्टीने होते. त्यामुळे ओम्नीला नवीन नियमानुसार अद्ययावत करणं शक्य नव्हतं. म्हणून 1984 मध्ये लाँच केलेली ही कार मारुती सुझुकीनं अखेर 2019 मध्ये बंद करण्याचा निर्णय मारुतीने घेतला.
advertisement
5/8
ओमनी कार आता परत येणार नाही. पण कारची एक वेगळीच ओळख होती. बॉलिवूडच्या जुन्या सिनेमांमध्ये खूप वेळा मारूती ओमनी सहज पाहिली जात होती. जेव्हाही अपहरणाचे सीन दाखवले आहेत, तेव्हा त्यात खलनायकांनी या मारूती कारचा वापर करायचे. त्यामुळे मारूती ओम्नीमध्ये अन्य कारपेक्षा असलेली एक वेगळी गोष्ट म्हणजे हिला असलेली स्लायडिंग डोअर्स. त्या डोअरमुळे या गाडीला सिनेमांमध्ये जास्त मागणी होती. त्यामुळेच या कारला किडनपिंग कार असं नावही पडलं.
advertisement
6/8
ओमनीचं इंजिन हे त्यावेळी 796 सीसीचं होतं. या कारमध्ये उपलब्ध असलेलं इंजिन 3 सिलिंडरचं होतं आणि त्याची पॉवर 35bhp इतकी असून ते 59 Nm इतकं टॉर्क जनरेट करतं होतं.
advertisement
7/8
मारूती ओम्नीची किंमत ही त्यावेळी मात्र खूपच कमी होती. त्यामुळे मध्यमवर्गीयांची ही पहिली पसंत होती. मारूती सुझुकी ओम्नी बंद होण्यापूर्वी त्या कारच्या 5 सीटर मॉडेलची किंमत 2.72 लाख (एक्स शोरूम) इतकी होती, तर 8 सीटर मॉडेलची किंमत 2.73 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी होती.
advertisement
8/8
ओमनी बंद झाल्यानंतर मारुतीने तिच्या जागी ecco लाँच केली. या गाडीने सुद्धा मार्केटमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करून आहे. ही MPV अनेक प्रकारे वापरली जाऊ लागली. डिलिव्हरी व्हॅन, स्कूल व्हॅन आणि अॅम्ब्युलन्स म्हणून ही 7 सीटर कार बाजारात खूप पसंत केली जात आहे. एवढंच नाहीतर फॅक्टरी फिटेड सीएनजी किटमध्ये येत असल्याने जबरदस्त मायलेज देखील मिळतं. याशिवाय Maruti Eeco ची एक्स-शोरूम किंमत फक्त 5,21,700 रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटसाठी किंमत 6,53,000 लाख रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे ही बजेट फ्रेडली कार ठरली आहे.