Kia: एक बटन दाबलं की SUV आपोआप होईल पार्क, 'ती' नव्या रुपात परत येतेय!
- Published by:sachin Salve
Last Updated:
रुबाबदार डिझाईनमुळे याा एसुव्हीची तुफान विक्री झाली. पण आता या सेल्टोस एसयुव्हीचं लवकरच नवीन अपग्रेड मॉडेल लाँच होणार आहे.
advertisement
1/6

हुंदई मोटर्सच्या नंतर दक्षिण कोरियाची किआ मोटर्स भारतात आली आणि बघता बघता या कंपनीने मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. किआने २०१९ मध्ये पहिल्यांदा लाँच झालेली सेल्टोस भारतात आणताच हिट झाली. रुबाबदार डिझाईनमुळे याा एसुव्हीची तुफान विक्री झाली. पण आता या सेल्टोस एसयुव्हीचं लवकरच नवीन अपग्रेड मॉडेल लाँच होणार आहे. ही एसयुव्ही नवीन सेगमेंट-फर्स्ट फीचरसह येण्याची अपेक्षा आहे.
advertisement
2/6
अलीकडेच नव्या किआ सेल्टोसचे नवीन फोटो समोर आले आहेत. या फोटोमधून एसयूव्हीची काही प्रमुख वैशिष्ट्यं उघड झाली. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, या कारमध्ये नवीन पार्किंग सेन्सर्स दिले आहे. सध्या, सेल्टोसमध्ये ४ फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स आहेत. नवीन सेल्टोसमध्ये ६ फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स दाखवण्यात आले.
advertisement
3/6
सुरुवातीला, हे कदाचित फार मोठे काम वाटणार नाही. पण जर असं अंदाज लावला जातोय की येणाऱ्या नव्या सेल्टोसमध्ये ऑटो पार्किंग फीचर असं शकते. सहसा वाहन उत्पादक ६ पार्किंग सेन्सर्ससह ऑटो पार्किंग सुविधा देतात आणि नवीन जनरेशन सेल्टोस ही एक खास एसयूव्ही असणार आहे, त्यामुळे ऑटो पार्किंग सेन्सर मिळणार आहे.
advertisement
4/6
तर पार्किंग सेन्सर्स व्यतिरिक्त, सेल्टोसला प्रशस्त आणि आरामदायी केबिन मिळण्याची अपेक्षा आहे. एसयूव्हीचं छत सरळ दिसतंय, जी केबिनमध्ये वाढलेल्या जागेचे संकेत देते.
advertisement
5/6
सायरोसप्रमाणे, सेल्टोसमध्ये स्लाइडिंग आणि रिक्लाइनिंग फंक्शन्ससह मागील हवेशीर सीट्स मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, नवीन सिल्हूट किआला सेल्टोसची बूट स्पेस सुधारण्यास मदत करू शकते.
advertisement
6/6
किआ सेल्टोस अनेक वेळा चाचणी दरम्यान दिसली आहे. असं असलं तरी, अपेक्षा आहे की कंपनी लवकरच ही एसयूव्ही लाँच करेल. २०२३ मध्ये या एसयूव्हीला एक मोठा फेसलिफ्ट मिळेल आणि नवीन जनरेशन २०२६ पर्यंत लाँच करू शकते.