TRENDING:

Ola Roadster: आता पेट्रोल Bike विसरा, मार्केटमध्ये येतंय तुफान, 501 किमी कुठेही फिरा!

Last Updated:
इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओलाने आता स्कुटरनंतर आपला मोर्चा बाइक उत्पादनाकडे वळवला आहे. ओलाने आता तामिळनाडूमधील फॅक्टरीमध्ये रोडस्टर एक्स सीरीज (Ola Roadster X)चं प्रोडक्शन सुरू केलं आहे.
advertisement
1/9
आता पेट्रोल Bike विसरा, मार्केटमध्ये येतंय तुफान, 501 किमी कुठेही फिरा!
इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओलाने आता स्कुटरनंतर आपला मोर्चा बाइक उत्पादनाकडे वळवला आहे. ओलाने आता तामिळनाडूमधील फॅक्टरीमध्ये रोडस्टर एक्स सीरीज (Ola Roadster X)चं प्रोडक्शन सुरू केलं आहे. एका महिन्यानंतर या बाइकचं उत्पादन सुरू केलं आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत या बाइकची डिलिव्हरी सुरू करणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी ही बाइक लाँच करण्यात आली होती.
advertisement
2/9
बंगळुरूमधील ईव्ही बाइक उत्पादक कंपनीने माहिती दिली आहे. बहुप्रतिक्षित रोडस्टर एक्स बाइकचं उत्पादन सुरू झालं आहे. एप्रिल २०२५ पासून ही बाइक रस्त्यावर धावताना दिसेल. कंपनीने बाइकचं उत्पादन सुरू केलं आहे, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल, अशी माहिती या कंपनीने दिली. ओला रोडस्टर एक्स या एंट्री लेव्हल सीरिजमध्ये रोडस्टर एक्स आणि रोडस्टर एक्स प्लस अशी दोन मॉडेल्स लाँच करण्यात आली . या दोन्ही मोटरसायकल्स एकदा चार्ज केल्यानंतर 501 किलोमीटर्सची रेंज देणार आहेत, असा कंपनीचा दावा आहे.
advertisement
3/9
आजचं रोल-आउट हे फक्त एका नव्या उत्पादनाचं सेलिब्रेशन आहे. आमच्यासाठी एका नव्या युगाचं हे प्रतिक आहे. कारण हे आता इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये नवी क्रांतीकारक असं पाऊल आहे. त्याचं हे नेतृत्व करणार आहे. आम्हाला आमच्या ग्राहकांना लवकरच रस्त्यावर रोडस्टर दुचाकीसह प्रवास करताना पाहायचं आहे. ही बाइक मोटारसायक्लिंग दुनियेचं चित्र पालटून टाकणार आहे, असा विश्वास ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी व्यक्त केला.
advertisement
4/9
किती आहे किंमत - रोडस्टर एक्स सीरीजची सुरुवाती किंमत 74,999 रुपये आहे. रोडस्टर एक्स 3.5 kWh ची किंमत 84, 999 रुपये एक्स शोरुम इतकी आहे. रोडस्टर एक्स 4.5 kWh ची किंमत 95,999 रुपये (एक्स-शोरूम), रोडस्टर एक्स+ 4.5 kWh ची किंमत 1,04,999 रुपये (एक्स-शोरूम) आणि रोडस्टर एक्स+ 9.1 kWh ची किंमत 1,54,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
advertisement
5/9
या मोटरसायकलची डिलिव्हरी आता एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. 501 किलोमीटर्स रेंज देणारी ही देशातली पहिली आणि स्वस्त मोटरसायकल ठरली आहे.
advertisement
6/9
ओला रोडस्टर एक्स प्लस - ही बाइक दोन बॅटरी पॅक्समध्ये लाँच करण्यात आली आहे. त्यात 4.5 किलोवॉट आणि 9.1 किलोवॉटच्या बॅटरी पॅकचा समावेश आहे. त्यात 11 किलोवॉट पीक पॉवरची मोटर मिळते. या मोटरसायकलचा टॉप स्पीड ताशी 125 किलोमीटर्स आहे. 0 ते ताशी 40 किलोमीटर्सचा वेग ही मोटरसायकल 2.7 सेकंदांत घेते.
advertisement
7/9
मोठ्या बॅटरी पॅकसह या गाडीची IDC रेंज 501 किलोमीटर्स असल्याचा कंपनीचा दावा आहे. 4.5 किलोवॉट बॅटरी पॅक असलेल्या व्हर्जनची किंमत 1,04,999 रुपये, तर 9.1 किलोवॉट बॅटरी पॅक असलेल्या व्हर्जनची किंमत 1,54,999 रुपये आहे. ही बाइक तीन बॅटरी पॅकच्या पर्यायांत लाँच करण्यात आली आहे. त्यात 2.5 किलोवॉट, 3.5 किलोवॉट आणि 4.5 किलोवॉट बॅटरी पॅकचा समावेश आहे. 7 किलोवॉट पीक पॉवरची मोटर मिळते.
advertisement
8/9
या मोटरसायकलचा टॉप स्पीड ताशी 118 किलोमीटर्स आहे. 0 ते ताशी 40 किमीचा वेग ही गाडी 3.1 सेकंदांत घेते. याची IDC रेंज 252 किलोमीटर्स असल्याचा कंपनीचा दावा आहे.
advertisement
9/9
Ola Roadster X मध्ये 4.3 इंचाचा एलसीडी कलर सेगमेंट डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये स्मार्ट कनेक्टिविटी आणि यूएसबी दिला आहे जो MoveOS 5 द्वारे चालतो. या बाइकमध्ये ३ रायडिंग मोड दिले आहे. स्पोर्ट्स, नॉर्मल आणि इको. तर दुसरीकडे रोडस्टर एक्स+ मध्ये सुद्धा 4.3 इंचाचा एलसीडी डिस्प्लेसह युएसबी दिला आहे. सध्या ओलाचं मार्केट डाऊन झालं आहे. पण या दोन अनोख्या बाइक ओलाला जीवदान देईल अशी शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Ola Roadster: आता पेट्रोल Bike विसरा, मार्केटमध्ये येतंय तुफान, 501 किमी कुठेही फिरा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल