Rain Vs Cars:..तेंव्हा कारचं टायर हे रस्ता सोडून हवेत असतं, पावसाळ्यातली सगळ्यात डेंजर थेअरी!
- Published by:sachin Salve
Last Updated:
जर तुम्ही पावसामध्ये भरधाव कार चालवत असाल तर आताच ब्रेक मारा. कारण, पाण्यामध्ये तुमच्या कारचं टायर हे रस्त्याच्या संपर्कातून बाजूला होतं अन् काही कळायच्या आत कार पलटी होते.
advertisement
1/11

गेल्या अनेक दशकांमध्ये पावसाला जून महिन्याच्या आधीच सुरुवात झाल्यामुळे वातावरण अचानक आल्हादायक झालं आहे. राज्यभरात दूरपर्यंत पाऊस धारा बरसत आहे. पण पाऊस जितका आल्हादायक जरी वाटत असला तरी तो तितकाच संकटात सुद्धा आणू शकतो. पावसाळ्यामध्ये अपघात आणि दुर्घटनेमध्ये वाढ होत असते. अशातच जर तुम्ही पावसामध्ये भरधाव कार चालवत असाल तर आताच ब्रेक मारा. कारण, पाण्यामध्ये तुमच्या कारचं टायर हे रस्त्याच्या संपर्कातून बाजूला होतं अन् काही कळायच्या आत कार पलटी होते.
advertisement
2/11
पावसाळ्यात कार पलटी होण्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. रस्त्याच्या बाजूला साचलेल्या पाण्यातून सुसाट कार पळवण्याचा अनेक जण प्रयत्न करतात पण तो अत्यंत धोकादायक आहे. नव्याने कार चालवणाऱ्या ड्रायव्हरने तर असा प्रयत्न चुकूनही करू नये
advertisement
3/11
ाची अनेक कारण आहे. रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं असतं अशावेळी पाण्यामुळे समोर किती खोल खड्डं आहे हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे पाण्यातून तुम्ही वेगाने कार पळवली अन् चाक खड्ड्यात अडकलं तर कार पलटी होऊ शकते.
advertisement
4/11
आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, ॲक्वाप्लॅनिंग (Aquaplaning) आणि हायड्रोप्लॅनिंग (Hydroplaning). आता या प्रकारामध्ये पावसात रस्त्यावर पाणी साचलेलं असतं. अशावेळी जेव्हा कार वेगाने या पाण्याच्या थरावरून जाते, तेव्हा टायर आणि रस्त्यामधील पाण्याचा दाब इतका वाढतो की, टायरचा रस्त्याशी संपर्क तुटतो. यामुळे टायर रस्त्यावर 'तरंगू' लागतं आणि गाडीवरील नियंत्रण सुटतं. हीच परिस्थिती ॲक्वाप्लॅनिंग. अशा वेळी ब्रेक दाबलं किंवा अचानक स्टिअरिंग फिरवली तर गाडी घसरून पलटी होण्याची दाट शक्यता असते.
advertisement
5/11
मुळात पावसात प्रवास करत असताना टायर तपासून पाहा. जुन्या आणि झीज झालेल्या टायरमध्ये 'ट्रेड' (tread) कमी असतो, ज्यामुळे ते पाणी योग्य प्रकारे बाहेर काढू शकत नाहीत. त्यामुळे ओल्या रस्त्यावर टायरची पकड (grip) कमी होते आणि गाडी घसरते.
advertisement
6/11
टायरमधील हवा तपासा - टायरमधील हवा नेहमी तपासात राहा, पावसाळ्यात प्रवासादरम्यान टायरामध्ये जर हवा कमी किंवा जास्त असेल तर रस्त्यावर पकड मजबूत राहू शकत नाही. त्यामुळे योग्य प्रमाणात हवा असणे गरजेचं आहे.
advertisement
7/11
पावसाळ्यात जास्त वेगात गाडी चालवू नका, कारण रस्त्यावर दृश्यमानता (visibility) पावसामुळे कमी होते. अशावेळी स्पीडमध्ये जर वाहन चालवत असाल आणि अचानक ब्रेक मारण्याची वेळ आली तर गाडी अनियंत्रित होते. ज्यामुळे कार पलटी होऊ शकते.
advertisement
8/11
आपल्याकडे रस्ते हे चांगले असतील हे फार कधी तरी घडतं. पावसामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे पाहण्यास मिळतात. त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नाही. स्पीडमध्ये कार असेल तर खड्ड्यातून गाडी गेल्यास नियंत्रण सुटून अपघात होऊ शकतो.
advertisement
9/11
पावसाळ्यात रस्त्यावर चिखल किंवा शेवाळ जमा होतं, ज्यामुळे रस्ते अधिक निसरडे होतात आणि टायरची पकड कमी होते. ओल्या किंवा निसरड्या रस्त्यावर अचानक ब्रेक लावणे किंवा अचानक स्टिअरिंग फिरवली तर कार स्किट होऊन पलटी होऊ शकते.
advertisement
10/11
पावसाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे? - पाऊस जर पडत असेल किंवा रस्ता ओला असेल तर कमी वेगात कार चालवा. टायरमध्ये योग्य हवा आहे का नेहमी चेक करा.
advertisement
11/11
साचलेल्या पाण्यातून वेगात कधीही गाडी चालवू नका. समोरील वाहनात आणि आपल्या कारमध्ये पुरेसं अंतर ठेवा. वायपर व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा. हेडलॅम्प्स आणि टेललॅम्प्सचा वापर करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Rain Vs Cars:..तेंव्हा कारचं टायर हे रस्ता सोडून हवेत असतं, पावसाळ्यातली सगळ्यात डेंजर थेअरी!