TRENDING:

आता Thar विकून टाका, Tata ने आणली 627 किमी रेंजची टँकसारखी SUV, किंमतही कमी

Last Updated:
टाटाने Tata Harrier.ev लाँच करून डब्बल धमाका केला आहे. एकतर या एसयूव्ही किंमत ही या सेगमेंटमध्ये कमी ठेवली आहे तर दुसरीकडे सर्वाधिक रेंजही तब्बल 627 किमी दिली आहे.
advertisement
1/7
आता Thar विकून टाका, Tata ने आणली 627 किमी रेंजची टँकसारखी SUV, किंमतही कमी
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली टाटा मोटर्सने आपली  Tata Harrier.ev  अखेर लाँच केली आहे. भारतात एकीकडे सर्वात जास्त रेंजची एसयूव्ही देण्याची स्पर्धा रंगली आहे, अशातच टाटाने Tata Harrier.ev लाँच करून डब्बल धमाका केला आहे. एकतर या एसयूव्ही किंमत ही या सेगमेंटमध्ये कमी ठेवली आहे तर दुसरीकडे सर्वाधिक रेंजही तब्बल 627 किमी दिली आहे. त्यामुळे EV SUV सेगमेंटमध्ये Tata Harrier.ev गेमचेंजर ठरणार आहे. 
advertisement
2/7
ठरल्याप्रमाणे आज ३ जून रोजी टाटा मोटर्सने बहुप्रतिक्षित Harrier.ev वर पडदा बाजूला केला आहे. Tata Harrier.ev ची किंमत 21. 49 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. या सगेमेंटमध्ये ही किंमत सगळ्यात कमी असल्यामुळे ईव्ही मार्केटमध्ये Tata Harrier.ev गेमचेंजर ठरणार आहे.  नवीन Harrier.ev मध्ये दोन बॅटरी पॅक दिले आहे. या SUV मध्ये 65kWh आणि 75mWh बॅटरी पॅक दिला आहे.
advertisement
3/7
  कंपनीने दावा केला आहे की, फक्त 15 मिनिट चार्ज केल्यावर  Tata Harrier.ev  250 किलोमीटर रेंज देईल. इतक्या रेंजमध्ये मुंबईहून पुण्याचा निम्मा प्रवास पूर्ण होतो. तर १०० टक्के चार्ज झाल्यावर Tata Harrier.ev ची रेंजही 627 किमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
advertisement
4/7
SUV सेगमेंटमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त रेंजही टाटा मोटर्सकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, Tata Harrier.ev ची बॅटरी इतक्या जलद गतीने चार्ज होते जी स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी लागतो. तसंच Harrier.ev च्या बॅटरीवर लाइफ टाइम वॉरंटी दिली आहे. त्यामुळे कोणतीही चिंता न बाळगता ही एसयूव्ही तुम्ही बिनधास्तपणे चालवू शकतात. 
advertisement
5/7
Tata Harrier.ev मध्ये 36.9cm चा HARMAN चा neo QLED डिस्प्ले दिला आहे. हा खूप चांगला असा डिस्प्ले आहे.  ही SUV, ड्यूल-मोटर सेटअपवर आहे त्यामुळे ही पहिली ऑल-व्हील ड्राइव्ह लेस एसयूव्ही आहे. टाटा मोटर्सने दावा केला आहे की, ही एसयुव्ही, ऑन रोड्स आणि ऑफ रोडवर  कोणत्याही अडथळ्याशिवाय चालेल.
advertisement
6/7
सेफ्टी फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर या Tata Harrier.ev मध्ये ६ एअरबॅग्स दिल्या आहेत ABS अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम दिली आहे ते EBD सह आहे. एवढंच नाहीतर ब्रेक असिस्ट, ऑटो होल्ड, ESC सारखे फिचर्स दिले आहे. 
advertisement
7/7
Harrier.ev च्या बॅटरीवर लाइफ टाइम वॉरंटी दिली आहे.   Harrier.ev सामना थेट Mahindra XEV 9e, BYD Atto 3 आणि Hyundai Creta Electric सारख्या EV SUV सोबत आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
आता Thar विकून टाका, Tata ने आणली 627 किमी रेंजची टँकसारखी SUV, किंमतही कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल