TRENDING:

1 लाखांच्या बजेटमध्ये मिळतात या बेस्ट बाइक्स! तिसरी सर्वांची आवडती, चेक करा लिस्ट

Last Updated:
Budget Bike under 1 Lakh: भारतातील तरुणांना स्टायलिश बाइक्स आवडतात. त्यांचे स्वप्न असते की, त्यांच्याकडे चांगली मोटरसायकल असावी, परंतु बऱ्याचदा बजेटच्या कमतरतेमुळे ते त्यांची आवडती बाईक खरेदी करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी अशा पाच बाईक घेऊन आलो आहोत, ज्यांची किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे. यासोबतच, या सर्व बाईक्समध्ये दमदार परफॉर्मेंस आणि स्टायलिश लूक आहेत. चला बघूया. 
advertisement
1/5
1 लाखांच्या बजेटमध्ये मिळतात या बेस्ट बाइक्स! तिसरी सर्वांची आवडती,चेक करा लिस्ट
Hero Xtreme 125R : हिरो मोटर्सने अलीकडेच त्यांची एक्सट्रीम 125R बाजारात लाँच केली आहे. त्याची किंमत ₹95,000 एक्स-शोरूम आहे. तर या बाईकचे ABS मॉडेल 99, 500 रुपयांना उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 125 सीसीचे पॉवरफूल इंजिन आहे. जे 11.4 बीएचपी पॉवर आणि 10.5एनएम टॉर्क जनरेट करते. 
advertisement
2/5
TVS Raider : हिरोशी स्पर्धा करण्यासाठी, टीव्हीएसने बाजारात रेडर 125 सीसी लाँच केली. ही बाईक तिच्या हलक्या वजनामुळे चर्चेत राहिली. या बाईकची सुरुवातीची किंमत ₹85,000 आहे, तर तिच्या टॉप मॉडेलची किंमत ₹1,04,471 एक्स-शोरूम किंमत ठेवण्यात आली आहे. या बाईकमध्ये iGO असिस्ट टेक्नॉलॉजी देण्यात आले आहे.
advertisement
3/5
Bajaj Pulsar N125 : तरुणांची सर्वात आवडती बाईक कंपनी असलेल्या बजाजने त्यांची Pulsar N125 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत बाजारात आणली आहे. या बाईकची मागणी सर्वाधिक आहे. या बाईकची रचना पल्सर N250 पासून प्रेरित आहे. या बाईकची किंमत ₹94,707-₹98,707 दरम्यान आहे.
advertisement
4/5
Honda SP 125 : होंडाने आपल्या ग्राहकांसाठी SP 125 बाजारात लाँच केली. ही बाईक 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत देखील एक चांगला ऑप्शन आहे. ही बाईक 125cc इंजिनने सुसज्ज आहे. जी 10.7 bhp पॉवर आणि 10.9 एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकची किंमत 87, 468 ते 91, 468 रुपयांच्या दरम्यान आहे.
advertisement
5/5
Bajaj Freedom CNG : पल्सर व्यतिरिक्त, बजाजने सीएनजीमध्ये बजाज फ्रीडम लाँच केले आहे. ज्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बजाज फ्रीडम ही जगातील पहिली सीएनजी बाईक आहे. ही बाईक पेट्रोलवरही चालवता येते. या बाईकची किंमत ₹89,997 ते ₹1.09 लाख दरम्यान आहे. बाईकमध्ये 2KG CNG टँक आणि 2 लिटर पेट्रोल टँकचा ऑप्शन आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
1 लाखांच्या बजेटमध्ये मिळतात या बेस्ट बाइक्स! तिसरी सर्वांची आवडती, चेक करा लिस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल