Toyota चा विषय आहे का? साहेबांना म्हणा, फॉर्च्युनर विकून टाका! आलीये नवीन Fortuner 2025
- Published by:sachin Salve
Last Updated:
टोयोटाची फॉर्च्युनरने गेली अनेक दशकं राजकीय नेते आणि सेलिब्रेटींमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. आता टोयोटाने Fortuner आणि Legender चं नवीन व्हेटिएंट लाँच केलं आहे
advertisement
1/8

टोयोटाने भारतात गेल्या अनेक दशकांपासून दणकट आणि मजबूत गाड्या देऊन मार्केटमध्ये वर्चस्व कायम राखलं आहे. टोयोटाची फॉर्च्युनरने गेली अनेक दशकं राजकीय नेते आणि सेलिब्रेटींमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. आता टोयोटाने Fortuner आणि Legender चं नवीन व्हेटिएंट लाँच केलं आहे.
advertisement
2/8
या दोन्ही एसयूव्ही अत्यंत दमदार आणि पॉवरफुल इंजिनसह येतात. टोयोटाच्या विक्रीमध्ये या दोन्ही गाड्यांचा मोठा हात आहे. जर तुम्ही Fortuner किंवा Legender खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर यामध्ये कंपनीने अपडेट दिली आहे.
advertisement
3/8
सगळ्यात आधी या एसयूव्हीच्या किंमतीचा विचार केला तर Toyota Fortuner Neo Drive 48V ची किंमत 44.72 लाख रुपये (एक्स शोरूम) ठेवली आहे.
advertisement
4/8
तर Toyota Legender Neo Drive 48V ची किंमत 50.09 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे. या दोन्ही मॉडलची किंमत जास्त आहे. पण या दोन्ही SUV D आणि D प्लस सेगमेंटमध्ये येतात.
advertisement
5/8
आता या दोन्ही एसयूव्हीची टक्कर ही थेट Skoda Kodiaq, MG Gloster आणि Volkswagen Tiguan शी असणार आहे. तसं पाहायला गेलो तर दोन्ही SUV खूप दमदार आणि अॅड व्हांस्ड फिचर्सने लेस आहे. त्यामुळे फॉर्च्युनरप्रेमींना कोणती एसयूव्ही आवडेल.
advertisement
6/8
इंजिन आणि मायलेज - टोयोटाच्या या दोन्ही एसयूव्ही अत्यंत दमदार अशाच आहे. कंपनीने दावा केला आहे की, या दोन्ही एसयूव्ही चांगलं मायलेज देतात. या एसयूव्हीमध्ये 2.8 लिटरचं चार सिलेंडर टर्बो डिझल इंजिन दिलं आहे. त्याशिवाय यामध्ये लिथियम आयन बॅटरी आणि स्टार्टर जेनरेटर आहे.
advertisement
7/8
टॉप फिचर्स - टोयोटा Fortuner आणि Legender मध्ये सेफ्टीसाठी 7 एअरबॅग्स, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम , ब्रेक अस्सिट, EBD, ट्रेक्शन कंट्रोल, प्री-टेंशनर, फोर्स लिमिटर, स्पीड ऑटो लॉक, सीट बेल्ट आणि हिल असिस्ट सारखे दमदार फिचर्स दिले आहे.
advertisement
8/8
हे एक हाइब्रिड असिस्ट असून कमी वेगात सुद्धा बॅटरी चार्ज करतो. त्यामुळे कारचं मायलेज हे आणखी वाढतं. पण या दोन्ही किती मायलेज देणार याबद्दल कंपनीने अजून काही खुलासा केला नाही. दोन्ही वाहनांमध्ये डिझेल इंजिन दिलं आहे पण प्रदुषण कमी करण्यासाठी यामध्ये 48V टेक्नोलॉजीचा समावेश केला आहे. हे फिचर्स पेट्रोल इंजिनमध्ये दिलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Toyota चा विषय आहे का? साहेबांना म्हणा, फॉर्च्युनर विकून टाका! आलीये नवीन Fortuner 2025