TRENDING:

HSRPवर सर्वात मोठी अपडेट! नंबर प्लेट नसल्यास होणार नाही RTO तील महत्त्वाचं काम

Last Updated:
HSRP Number Plate Update: सध्या राज्यभरात एचएसआरपी नंबर प्लेटची चर्चा सुरु आहे. कारण येत्या 30 तारखेला ही नंबर प्लेट लावण्याची मुदत संपणार आहे.
advertisement
1/9
HSRPवर सर्वात मोठी अपडेट! नंबर प्लेट नसल्यास होणार नाही RTO तील महत्वाचं काम
HSRP Number Plate Latest Update: महाराष्ट्र सरकारने प्रत्येक वाहनाला एसएसआरपी नंबर प्लेट लावणं अनिवार्य केलं आहे. मात्र अद्यापही राज्यातील बहुतेक वाहन धारकांनी ही नंबर प्लेट लावलेली नाही.
advertisement
2/9
एसएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी मुदत ही राज्य सरकारने वाढवली आहे. आता येत्या 30 जूनपर्यंत तुम्ही ही नंबर प्लेट लावून घेऊ शकता. यामुळे वाहनधारकांना चांगली संधी मिळाली आहे.
advertisement
3/9
यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही अशी चर्चा आहे. यामुळे प्रत्येक वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी घाई करणं गरजेचं आहे. यासोबतच आणखी एक टेन्शन राज्य सरकारने वाढवलं आहे.
advertisement
4/9
ज्या वाहनधारकांकडे एचएसआरपी नंबर प्लेट नाही त्यांची महत्त्वाची कामं थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. येत्या 16 जूनपासून ही पाटी नसलेल्या वाहनधारकांची आरटीओमधील कामं थाबवण्याती येतील असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं टेन्शन वाढणार आहे.
advertisement
5/9
केंद्र सरकारने निर्णय दिला त्यानंतर 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र नागरिकांनी ते गांभिर्याने घेतलंलं नाही. याच कारणामुळे परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व आरटीओ कार्यालयांना एक महत्त्वाचा आदेश दिला.
advertisement
6/9
या आदेशा अंतर्गत आता 16 जून 2025 पासून एचएसआरपी पाटी नसलेल्या वाहनधारकांची महत्त्वाची कामं थांबवण्यात येणार आहेत. यामध्ये वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रामध्ये बदल करणे, वाहनावतील वित्त बोझा चढवणे आणि उतरवणे, तसंच दुय्यम नोंदी प्रमाणपत्र देण्यात येणे, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमधील काही बदल करणे अशी कामं थांबवली जाणार आहेत. पण जर तुमच्याकडे पाटी बसवण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती असेल तर तुमची कामं होऊ शकतात.
advertisement
7/9
HSRP ही एक विशेष सुरक्षा फीचर असलेली नंबर प्लेट आहे, ज्यामध्ये 10-अंकी य लेसर-ब्रँडेड आयडी नंबर आणि लेसर-एच केलेला कोड असतो. यामुळे प्लेट छेडछाड-प्रतिरोधक बनते. ती दुर्मिळ अॅल्युमिनियम मिश्र धातुपासून बनलेली असते आणि IND बॅजिंग असते. ज्यावर अशोक चक्राचा होलोग्राम हॉट-स्टॅम्प केलेला असतो.
advertisement
8/9
याशिवाय, प्लेटवर एक रिफ्लेक्टिव्ह फिल्म असते, ज्यावर "INDIA" छापलेला असतो. कारसाठी, विंडशील्डवर अतिरिक्त क्रोमियम-आधारित होलोग्राम स्टिकर लावला जातो, जो वाहनाच्या नोंदणी डिटेल्सची नोंद करतो. बनावट नंबर प्लेट रोखणे, वाहन सुरक्षा वाढवणे आणि चोरीला आळा घालणे हे या हालचालीचे उद्दिष्ट आहे.
advertisement
9/9
नवीन वाहनांमध्ये आधीच HSRP बसवलेले आहे. परंतु 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांना ही प्लेट स्वतंत्रपणे बसवावी लागेल. महाराष्ट्रातील वाहन मालकांना वाहतूक विभागात नोंदणीकृत असलेल्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच HSRP बसवावी लागेल. अधिकृत डीलर्सची यादी VAHAN पोर्टलवर उपलब्ध आहे, जिथून वाहन मालक माहिती मिळवू शकतात आणि त्यांच्या वाहनासाठी HSRP बुक करू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
HSRPवर सर्वात मोठी अपडेट! नंबर प्लेट नसल्यास होणार नाही RTO तील महत्त्वाचं काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल