हे आहेत 2025 चे OTT स्टार, कोणाचं एका रात्री बदलंल नशीब, कोणाची मेहनत फळाला
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT : 2025 मध्ये अनेक जबरदस्त सीरिज रिलीज झाल्या. या ओटीटीवरील सीरिज आणि फिल्मच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांचं आयुष्य बदललं आहे.
advertisement
1/7

जहान कपूर : जहान कपूरला 'ब्लॅक वॉरंट' या सीरिजसाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला आहे. जहान कपूर हा बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा चुलत भाऊ आहे. शशी कपूर यांचा तो नातू असून कुणाल कपूर यांचा मुलगा आहे. जहानने 'फराज' या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केलं होतं.
advertisement
2/7
राघव जुयाल : राघव जुयाल 2025 मध्ये स्ट्रेटेजिक करिअर ट्रान्झिशनच्या माध्यमातून ओटीटी स्टार झाला आहे. नेटफ्लिक्सच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरिजमध्ये त्याने धुमाकूळ घातला आहे. या सीरिजच्या माध्यमातून तो 2025 चा ओटीटी स्टार झाला आहे. मेहनत, आत्मविश्वास आणि अभिनयाच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे.
advertisement
3/7
वैभव राज गुप्ता : 'मंडला मर्डर्स'मध्ये वैभव राज गुप्ताने खूप वेगळ्या पद्धतीने काम केलं आहे. 'मंडला मर्डर्स'मध्ये त्याने साकारलेल्या डिटेक्टिव्ह विक्रम सिंहने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
advertisement
4/7
लक्ष्य लालवानी : लक्ष्य लालवानी 2025 चा ओटीटी स्टार आहे. त्याचं काम अनेक दिवस प्रेक्षकांच्या लक्षात राहिल. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये त्याने आपल्या कामाने प्रेक्षकांवर विशेष छाप पाडली आहे.
advertisement
5/7
मोना सिंह : मोना सिंह 2025 मधील एक प्रभावशाली ओटीटी परफॉर्मर ठरली आहे. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या माध्यमातून तिने चांगलाच धमाका केला. ओटीटीवर दमदार कलाकारांमध्ये मोना सिंहचा समावेश होतो. विशेष म्हणजे आपल्या कामाने तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे.
advertisement
6/7
कोंकणा सेन शर्मा : कोंकणा सेन शर्माने 'सर्च: द नैना मर्डर केस' या क्राइम सीरिजमध्ये एसीपी संयुक्ता दास ही भूमिका साकारली आहे. ही सीरिज ओरिजनल डॅनिश नॉयर थ्रिलर 'द किलिंग'वर आधारित आहे. आपल्या भूमिकेच्या माध्यमातून कोंकणा सेन शर्माने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
advertisement
7/7
परमवीर सिंह चीमा : 'ब्लॅक वॉरंट'च्या माध्यमातून परमवीर सिंह चीमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शिवराज सिंह मंगत ही भूमिका त्याने साकारली आहे. तसेच 'तेरे इश्क में'मध्ये तो कृती सेननच्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हे आहेत 2025 चे OTT स्टार, कोणाचं एका रात्री बदलंल नशीब, कोणाची मेहनत फळाला