TRENDING:

Aai Kuthe Kay Karte Last Episode Date : आई कुठे काय करते घेणार प्रेक्षकांचा निरोप, 'या' दिवशी टेलिकास्ट होणार शेवटचा एपिसोड

Last Updated:
Aai Kuthe Kay Karte Last Episode Date : महाराष्ट्राची लाडकी आई म्हणजेच अरुंधती आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आई कुठे काय करते ही मालिका संपणार असून मालिकेचा शेवटचा एपिसोड कधी टेलिकास्ट होणार आहे जाणून घ्या.
advertisement
1/9
आई कुठे... घेणार प्रेक्षकांचा निरोप, 'या' दिवशी टेलिकास्ट होणार शेवटचा एपिसोड
मराठी टेलिव्हिजनवरील काही कल्ट मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ''आई कुठे काय करते''. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
advertisement
2/9
''आई कुठे काय करते'' असं सहजपणे बोललं जायचं पण या वाक्यामागे असलेल्या एका आईच्या भावना या मालिकेतून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या.
advertisement
3/9
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ''आई कुठे काय करते'' ही मालिका पाहिली गेली. मालिकेतील अरुंधती महाराष्ट्राने डोक्यावर घेतली.
advertisement
4/9
"आई कुठे काय करते" ही स्टार प्रवाहवरची मालिका आपला लवकरच निरोप घेणार आहे. मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी यांनी ही माहिती कन्फर्म केली आहे. मिलिंद गवळी यांच्या लेटेस्ट पोस्टमध्ये त्यांनी ही माहिती दिली.
advertisement
5/9
2019 पासून ''आई कुठे काय करते'' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तब्बल 5 वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
advertisement
6/9
मालिका सुरू झाल्यापासून अनेक आठवडे टीआरपीमध्ये नंबर वनवर होती. मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं.
advertisement
7/9
काही कारणास्तव मालिकेची वेळ बदलण्यात आली. स्टार प्रवाहवर ही मालिका आधी संध्याकाळी 7.30 वाजता लागायची. त्यानंतर मालिका दुपारी 2.30 वाजता दाखवण्यात आली.
advertisement
8/9
''आई कुठे काय करते'' या मालिकेच्या जागी ''आई आणि बाबा रिटायर होत आहेत'' ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका 2 डिसेंबरपासून दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे.
advertisement
9/9
याचाच अर्थ ''आई कुठे काय करते'' या मालिकेचा शेवटचा एपिसोड हा 30 नोव्हेंबर रोजी टेलिकास्ट होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Aai Kuthe Kay Karte Last Episode Date : आई कुठे काय करते घेणार प्रेक्षकांचा निरोप, 'या' दिवशी टेलिकास्ट होणार शेवटचा एपिसोड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल