TRENDING:

Aai Kuthe Kay Karte : मराठी TVची सर्वात हिट मालिका पुन्हा सुरू होतेय, अरुंधती परत येतेय; पण कधीपासून?

Last Updated:
Aai Kuthe Kay Karte Come Back : आई कुठे काय करते ही मालिका पुन्हा टेलिव्हिजनवर सुरू होणार आहे. अरुंधती आणि देशमुख कुटुंब पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
advertisement
1/9
मराठी TVची सर्वात हिट मालिका पुन्हा सुरू होतेय, अरुंधती परत येतेय; पण कधीपासून?
मराठी टेलिव्हिजनची सर्वात हिट मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. तब्बल 5 वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली. अरुंधती देशमुख आणि तिच्या भोवती फिरणारी मालिकेची गोष्ट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.
advertisement
2/9
वर्षभरापूर्वीच 'आई कुठे काय करते' या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर अनेकदा ही मालिका पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रेक्षकांकडून करण्यात आली होती. 'आई कुठे काय करते' मालिकेनंतर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या पण आई कुठे काय करतेसारखी प्रसिद्धी मालिकांना मिळाली नाही.
advertisement
3/9
अखेर प्रेक्षकांची ती इच्छा पूर्ण होणार आहे. 'आई कुठे काय करते' ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चॅनलकडून नुकतीच ही माहिती देण्यात आली आहे.
advertisement
4/9
'आई कुठे काय करते' ही मालिका येत्या 22 डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता पाहता येणार आहे. मालिका पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती समोर येताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
advertisement
5/9
संध्याकाळी सात वाजता आई कुठे काय करते ही मालिका कशी काय सुरू होऊ शकते असा प्रश्न तुमच्याही मनात उपस्थित झाला का? तर ही मालिका स्टार प्रवाहवर नाही तर प्रवाह पिक्चर या वाहिनीवर सुरू होणार आहे. प्रवाह पिक्चरच्या सोशल मीडियावर मालिकेचा जुना प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 
advertisement
6/9
प्रवाह पिक्चरवर अनेक मराठी सिनेमे दाखवले जातात. तसंच स्टार प्रवाहच्या अनेक जुन्या मालिका देखील पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच आता रात्री 7 वाजता आई कुठे काय करते ही मालिका देखील पाहायला मिळणार आहे. 
advertisement
7/9
अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आप्पा, आई, अभिषेक, यश, ईशा सारख्या अनेक पात्र या मालिकेनं प्रेक्षकांना दिली. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधतीची उत्तम भूमिका साकारली होती. तर अभिनेते मिलिंद गवळी यांनी अनिरुद्ध आणि संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसलेनं साकारली होती. 
advertisement
8/9
दरम्यान आई कुठे काय करते मालिकेतील तीन महत्त्वाची पात्र म्हणजेच अरुंधती, अनिरुद्ध आणि संजना तिघेही स्टार प्रवाहवर परत आले आहेत. मधुराणी प्रभुलकरची मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका जानेवारी 2026 पासून सुरू होतेय. तर अनिरुद्ध देखील वचन दिले तू मला मालिकेत दिसणार आहे.
advertisement
9/9
रुपाली भोसले लंपडाव या मालिकेत खलनायिका साकारत आहे.  आई कुठे काय करते ही मालिका संपल्यानंतर कलाकारांना दमदार मालिकांमधून कमबॅक केलं आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Aai Kuthe Kay Karte : मराठी TVची सर्वात हिट मालिका पुन्हा सुरू होतेय, अरुंधती परत येतेय; पण कधीपासून?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल