TRENDING:

Actress Life: लग्न न करता 'या' अभिनेत्रीला व्हायचंय आई, लग्नापूर्वीच केली मोठी घोषणा

Last Updated:
Actress Life: टीव्हीवर आपल्या गोंडस स्माईल आणि स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री. ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
advertisement
1/7
लग्न न करता 'या' अभिनेत्रीला व्हायचंय आई, लग्नापूर्वीच केली मोठी घोषणा
टीव्हीवर आपल्या गोंडस स्माईल आणि स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री. ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण तिचं रिलेशनशिप किंवा करिअर नाही, तर तिनं घेतलेला मोठा निर्णय आहे. तिने लग्नाआधीच बाळाची इच्छा व्यक्त केली आहे.
advertisement
2/7
आपण बोलत असलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जास्मिन भसीन आहे. 'टशन-ए-इश्क' (Tashan-e-Ishq) 2015 मध्ये या मालिकेतून तिने हिंदी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.
advertisement
3/7
जास्मिननं सांगितलं की तिला आयुष्यात एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. जास्मिनच्या या निर्णयामुळे चाहते तिचं कौतुक करत आहेत. तिनं हा निर्णय का घेतला? याचं कारणंही तिने सांगितलं.
advertisement
4/7
जास्मिन भसीन म्हणली,"जेव्हा मी घर सोडलं तेव्हा मला जाणवलं की जीवन किती कठीण आहे. तेव्हाच मी देवाला वचन दिलं की जेव्हा मी इतकी सक्षम बनेन की दुसऱ्याला आनंद देऊ शकेन, तेव्हा मी एक मुलगी दत्तक घेईन आणि तिचं संगोपन करीन,"
advertisement
5/7
ती म्हणाली, "लग्न हे माझं अंतिम ध्येय नाही. मला योग्य जोडीदार मिळाला तर उत्तमच, पण नाही मिळाला तरी हरकत नाही. मात्र मी मुलगी दत्तक घेणारच."
advertisement
6/7
बिग बॉसच्या घरात असतानाही जास्मिननं हा विषय उचलला होता. शार्दुल पंडितशी बोलताना तिनं मन मोकळं केलं होतं. त्या वेळीही तिचं म्हणणं असंच होतं की लग्न झालं नाही तरी तिला आई व्हायचं आहे आणि ती दत्तक घेईल.
advertisement
7/7
चाहत्यांनी तिच्या या निर्णयाचं भरभरून कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर लोक तिचं धाडस, विचारसरणी आणि संवेदनशीलता यांचं कौतुक करत आहेत. कमेंट्समध्ये "देव तुझं स्वप्न पूर्ण करो" अशा शुभेच्छा देत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actress Life: लग्न न करता 'या' अभिनेत्रीला व्हायचंय आई, लग्नापूर्वीच केली मोठी घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल