TRENDING:

TRP टॉपवर असतानाच 'कमळी' मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्झिट? नेमकं कारण काय?

Last Updated:
कमळी मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय आहे. मालिका TRP मध्येही टॉपमध्ये असताना अचानक मालिकेतून एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्झिट होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात.
advertisement
1/9
TRP टॉपवर असतानाच 'कमळी' मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्झिट? नेमकं कारण काय?
टेलिव्हिजनच्या काही प्रसिद्ध मालिकांपैकी एक मालिका म्हणजे कमळी. झी मराठीवरील या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. कोल्हापूरहून मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या कमळीची स्टोरी प्रेक्षकांना भावली. कमळी मालिकेत दमदार स्टारकास्ट आहे. मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
advertisement
2/9
पण आता मालिकेतील एक पात्र कमी होणार आहे अशा चर्चा आहेत. मालिकेतून एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्झिट होणार असल्याचं बोललं जात आहे. कोण आहे ती अभिनेत्री आणि ती मालिका का सोडतेय?
advertisement
3/9
कमळी आणि ऋषी यांची जोडी प्रेक्षकांना आवडतेय. मालिकेत अनेक कलाकारांनी त्यांच्या दमदार भूमिका वठवल्या आहेत. त्यातील एक पात्र म्हणजे राधिका वहिनी.
advertisement
4/9
ऋषीला कायम समजून घेणारी त्याची वहिनी. कमळी आणि ऋषी एकत्र यावेत असं वहिनीला वाटत असतं. पण आता हीच वहिनी मालिकेतून एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement
5/9
कमळी मालिकेत राधिका वहिनीची भूमिका अभिनेत्री सई कल्याणकर हिनं साकारली आहे. राधिका वहिनीच्या गोड, प्रेमळ स्वाभावानं प्रेक्षकांची मनं जिंकली. पण राधिका म्हणजेच अभिनेत्री सई कल्याणकर कमळी मालिकेतून एक्झिट घेणार अशा चर्चा सुरू आहेत. यामागचं कारण म्हणजे अभिनेत्री सई लवकरच आई होणार आहे.
advertisement
6/9
सई प्रेग्नंट असून नुकतंच तिचं डोहाळे जेवण पार पडलं आहे. सई कल्याणकर लग्नाच्या चार वर्षांनी आई होणार आहे.  तिच्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. प्रेग्नंसीच्या काळातही ती कमळी मालिकेत काम करतेय. सईच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
advertisement
7/9
सई प्रेग्नंसीत सातव्या महिन्यापर्यंत मालिकेत काम करतेय. पण कधीच ती प्रेग्नंट असल्याचं लक्षात आलं नाही. प्रेग्नंसीसाठी सई मालिकेतून एक्झिट घेणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
advertisement
8/9
सई कमळी मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेणार की मालिका कायमची सोडणार याची माहिती समोर आलेली नाही. प्रेक्षक सईकडून याबाबतची अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
advertisement
9/9
अभिनेत्री सई कल्याणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास तिने आतापर्यंत दख्खनचा राजा ज्योतिबा, ठिपक्यांची रांगोळी सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. सई गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात सक्रीय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
TRP टॉपवर असतानाच 'कमळी' मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्झिट? नेमकं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल