TRENDING:

कतरिनानंतर आणखी एक अभिनेत्री देणार गुडन्यूज, 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई?

Last Updated:
बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा गोड बातमी ऐकायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच कतरिना कैफने तिच्या पहिल्या गरोदरपणाची घोषणा केली होती. आता कपूर घराण्यातही आनंदाचं वातावरण आहे.
advertisement
1/7
कतरिनानंतर आणखी एक अभिनेत्री देणार गुडन्यूज, 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई?
बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा गोड बातमी ऐकायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच कतरिना कैफने तिच्या पहिल्या गरोदरपणाची घोषणा केली होती. आता कपूर घराण्यातही आनंदाचं वातावरण आहे. अभिनेता अनिल कपूर पुन्हा एकदा आजोबा होणार असल्याचं समोर येतंय.
advertisement
2/7
अनिल कपूरची मोठी मुलगी आणि बॉलिवूडची फॅशन क्वीन सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा आहे. ही गुडन्यूज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
advertisement
3/7
2018 मध्ये सोनमने उद्योगपती आनंद आहुजा याच्यासोबत लग्न केले होते. लग्नानंतर 2022 मध्ये दोघांना मुलगा झाला, ज्याचं नाव वायु आहे. आता पुन्हा त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
4/7
समोर आलेल्या माहितीनुसार, सोनम तीन महिन्यांहून अधिक काळ गर्भवती आहे. आहुजा आणि कपूर कुटुंबात यामुळे प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अद्याप सोनम किंवा तिच्या कुटुंबीयांनी या बातमीची अधिकृत पुष्टी केलेली नाही. तरीसुद्धा चाहत्यांनी सोशल मीडियावर सोनमला शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.
advertisement
5/7
सोनम कपूर सध्या चित्रपटांपासून थोडी दूर आहे आणि कुटुंबासोबत वेळ घालवते. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते, मात्र मुलगा वायुचा चेहरा ती क्वचितच दाखवते. फोटो किंवा व्हिडीओ शेअर करताना ती त्याचा चेहरा लपवते.
advertisement
6/7
सोनमचा शेवटचा चित्रपट 'ब्लाइंड' हा 2023 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने कोणत्याही नव्या प्रोजेक्टला होकार दिलेला नाही. सध्या ती तिच्या दुसऱ्या गरोदरपणाचा काळ एन्जॉय करत आहे.
advertisement
7/7
दरम्यान, आता चाहते सोनम कधी अधिकृतरित्या गुडन्यूजची घोषणेची करतेय याची वाट पाहत आहे. मात्र त्याअगोदरच ही गोड बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कतरिनानंतर आणखी एक अभिनेत्री देणार गुडन्यूज, 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल