TRENDING:

अक्षय खन्नापेक्षा भारी दिसतो त्याचा मोठा भाऊ, वयाच्या 53 व्या वर्षीही आहे हँडसम, कोण आहे हा?

Last Updated:
Akshaye Khanna Elder Brother : अक्षय खन्नाचा मोठा भाऊ दिसायला खूपच हँडसम आहे. वयाच्या 53 व्या वर्षीही 25 वर्षाला मागे टाकणारा त्याचा हँडसमनेस आहे.
advertisement
1/7
अक्षय खन्नापेक्षा भारी दिसतो त्याचा मोठा भाऊ, वयाच्या 53 व्या वर्षीही आहे हँडसम
'धुरंधर'च्या रिलीजनंतर सर्वत्र अक्षय खन्नाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अक्षय खन्नाचं कौतुक होत आहे. त्याने साकारलेली रहमान डकैतची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अक्षयचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी एक व्यक्ती मात्र अक्षयचं कौतुक करण्यात मागे पडला आहे.
advertisement
2/7
अक्षय खन्नाचा मोठा भाऊ राहुल खन्ना सोशल मीडियावर सक्रीय असतो. पण 'धुरंधर'च्या रिलीजनंतर मात्र त्याने विशेष प्रतिक्रिया किंवा अक्षय खन्नाचं कौतुक केलेलं नाही.
advertisement
3/7
अक्षय खन्नाच्या मोठा भावाचं नाव राहुल खन्ना आहे. राहुल हादेखील दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. राहुल खन्ना अक्षयपेक्षा तीन वर्षाने मोठा आहे. दोघेही भाऊ सिने इंडस्ट्रीत सक्रीय आहेत. पण दोघांची पर्सनॅलिटी आणि करिअर खूप वेगळं आहे.
advertisement
4/7
अक्षय खन्नाने हिंदी सिनेसृष्टीत गंभीर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांना न्याय दिला आहे. तर दुसरीकडे राहुल खन्नाने अभिनयासह मॉडेलिंग, इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स आणि लाइफस्टाइल लेखनात आपली विशेष जागा निर्माण केली आहे.
advertisement
5/7
राहुल खन्ना यांनी सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये दुरावा निर्माण केला होता. ग्लॅमरस विश्वासापासून दूर राहणं त्याने पसंत केलं. पण तरीही इंडस्ट्रीत त्याची वेगळी ओळख आहे. राहुल खूप हँडसम आणि आपल्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत राहिला. वयाच्या 53 व्या वर्षीही त्याचा फिटनेस 25 वर्षीय तरुणाला लाजवणारा आहे.
advertisement
6/7
राहुल खन्नाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 1990 मध्ये इंटरनॅशनल फॅशन सर्किटमध्ये तो लोकप्रिय होता. त्याने हॉलिवूड आणि यूरोपमधील मोठ-मोठ्या ब्रँड्ससोबत काम केलं आहे. राहुलने 1990 मध्ये 'अर्थ' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. बॉलिवूड हॉलिवूड, लव आज कल आणि कुछ चुनिंदा या चित्रपटांतही त्याने काम केलं आहे.
advertisement
7/7
राहुल खन्नाचं वैयक्तिक आयुष्य खूप प्रायव्हेट आणि लाइमलाइटपासून दूर राहिलं. राहुल खन्ना सोशल मीडियावर ट्रॅव्हल, पुस्तकं, फॅशन, फिटनेस आणि लाइफस्टाइलसंबंधित गोष्टी शेअर करत असतो. अक्षय खन्नाप्रमाणेच राहुल खन्नादेखील सिंगल आयुष्य जगतोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अक्षय खन्नापेक्षा भारी दिसतो त्याचा मोठा भाऊ, वयाच्या 53 व्या वर्षीही आहे हँडसम, कोण आहे हा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल